मासळीच्या दरातही थोड्याफार प्रमाणात चढ-उतार कायम
म्हापसा : येथील बाजारपेठ चालू आठवड्यात टॉमेटोचा भाव बऱ्यापैकी वधारला असून येत्या दिवसांत या किमती अशाच वाढत जाणार आहेत. तर बटाट्यासह इतर भाजीपाल्यांचा दर काहीसा जैसे थेच आहे.
भाजीपाल्याचा घाऊक बाजार भाव प्रति किलो प्रमाणे टॉमेटो ४० रूपये, बटाटे ४५ रूपये, कांदा ५०-५५ रूपये, गाजर ८० रूपये, वांगी ५० रूपये, ढब्बू मिरची ७० रूपये, कोबी ३५ रूपये, कॉली प्लॉवर ४५ रूपये, दुधी ३५ रूपये, मिरची (मोठी) ५० रूपये, मडगड मिरची ४० रूपये, आले ८० रुपये, लसूण ३८० रूपये किलो, भेंडी ४० रूपये किलो, लिंबू 4 रूपये नग, पालक १० रूपये जुडी, तांबडीभाजी १० रूपये जुडी, कोथिंबीर २० रूपये जुडी, शेपू १० रूपये जुडी, कांदा पात १० रूपये जुडी, मेथी १० रूपये जुडी, मका ४० रूपयांना तीन नग, कारले ५० रूपये किलो , दोडका ५० रूपये, बीट ५० रूपये किलो, चिटकी ६० रूपये किलो, वाल ५० रूपये किलो, काकडी ४० रूपये किलो.
मासळीमध्ये इसवण ८० रूपये किलो, चणाक 500 रूपये किलो, पापलेट ८०० रूपये किलो, काळी पापलेट ४०० रूपये किलो, सुगंटा (कोळंबी) ५०० रूपये किलो, कर्ली २५० रूपये किलो, बांगडा १०० रूपये किलो, टोकी २०० रूपये किलो, लेपो २०० रूपये किलो, खेकडे २५० रुपये किलो, खुबे-तिसर्या २०० रूपये किलो, वेरली १५० रुपये किलो, माणकी ४५० रूपये किलो , दोडयारे २०० रूपये किलो, मोडसो ४०० रूपये किलो, मूड्डोशी ४०० रुपये किलो तर कोकार २५० रूपये किलो असे दर आहेत. चिकनचे दर १८० (ब्रॉयलर) रूपये किलो, मटन ८०० रूपये किलो व अंडी ७५ रूपये डझन आहेत