गोवा। सशस्त्र क्रांतीमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पॅनोरामा ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
गोवा। सशस्त्र क्रांतीमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले

पणजी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले आहे. जे अहिंसक होते त्यांना राजवाड्यात बंद करून त्यांची सर्व सोय केली मात्र ज्यांनी स्वातंत्र्यासाठी शस्त्रे उचलली त्यांना काळापाणी भोगण्यासाठी पाठवले. अहिंसेमुळे नव्हे तर सशस्त्र क्रांतीमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, असे हिंदी चित्रपट अभिनेते रणदीप हुडा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर बोलताना सांगितले.


रणदीप हुडा यांनी अभिनय व दिग्दर्शन केलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे इफ्फीत भारतीय पॅनोरामा ओपनिंग फिल्म म्हणून गुरुवारी प्रदर्शन झाले. त्यावेळी हुडा यांनी आपले विचार मांडले. यावेळी इतर कलाकार अंजली हुडा, जय पटेल, अमित सियाल आणि मृणाल दत्ता यांची उपस्थिती होती.