छत्तीसगड : सुकमामध्ये डीआरएफ आणि सीआरपीएफची धडक कारवाई; चकमकीत १० नक्षलवादी ठार

सर्व मृतदेह आणि ३ ऑटोमॅटिक शस्त्रे जप्त; जानेवारीपासून आतापर्यंत २०८ नक्षलवादी मारले गेलेत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
छत्तीसगड : सुकमामध्ये डीआरएफ आणि सीआरपीएफची धडक कारवाई; चकमकीत १० नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीदरम्यान १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून सर्वांचे मृतदेह आणि ३ स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांसोबत डीआरएफ आणि सीआरपीएफ यांच्यात दंतेसपुरम, कोराजुगुडा, भेज्जीच्या नागरामच्या जंगलात चकमक झाली. अजूनही या आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.


 

यावर्षी १ जानेवारी ते २२ नोव्हेंबरपर्यंत एकंदरीत २०७ नक्षलवादी मारले गेले आहेत. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत ऑटोमॅटीक एके-४७, इन्सास आणि एसएलआरसह इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. ओडिशाला लागून असलेल्या गरियाबंदमध्ये गुरुवारी एक चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच गरियाबंद पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. या ऑपरेशनमध्ये गारियाबंद डीआरजी, कोब्रा २०७ बटालियन, ओडिशा एसओजी, सीआरपीएफ २११ आणि ६५ बटालियनचे सुमारे २०० जवान सहभागी झाले होते.


Sukma Encounter: DRG जवानों और नक्सलियों के बीच मुठभेड़, 2 नक्सली ढेर; सर्च  ऑपरेशन जारी


नक्षलवादी आमदच्या जंगलात पोहोचताच त्यांना जवानांची चाहूल लागली व त्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी पळ काढला तर १० जण मारले गेले.  दरम्यान नक्षलवाद्यांच्या अड्ड्यातून पोलिसांनी एक गोळी रायफल, नक्षलवादी साहित्य, मोठ्या प्रमाणात उबदार कपडे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त केल्या आहेत.  सुकमामध्ये जवानांना मोठे यश मिळाले आहे. सरकार नक्षलवादाबद्दल शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करत आहे. बस्तरमधील विकास, शांतता आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही त्यांच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री साय म्हणाले. त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे.


सैनिकांनी गरियाबंदमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले होते.


हेही वाचा