मॉस्को : नुकतेच रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला १००० दिवस पूर्ण झाले. यावेळी अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने सत्तेतून पायउतार होता होता रशियाची खोड काढली. अमेरिकेने युक्रेनला रशियाविरुद्ध अमेरिकन शस्त्रे मुक्तपणे वापरण्याची मुभा दिली. दरम्यान यावर पुतीन यांनी क्रेमलिनमधून डरकाळी फोडत 'पुढील पावले जपून टाका असे अमेरिका आणि नाटो देशांना' चिथावणी दिली. तरीही युक्रेन काही बधला नाही आणि त्याने रशियावर परवा हल्ला चढवला.
दरम्यान आज चवताळलेल्या पुतीनने युक्रेनवर हल्ला करण्याचे रीतसर आदेश दिले. लगेच रशियन सैन्याने आदेशांचे पालन करत अगदी नव्या कोऱ्या आयसीबीएम इंटरकॉन्टिनेन्टल मिसाईलने युक्रेनच्या डनिप्रो शहरावर भीषण हल्ला केला. हा हल्ला होणार हे निश्चितच होते. याच अनुषंगाने विचार करत आईसलँड,डॅन्मार्क, स्वीडन व नॉर्वे या देशनी आपली कीव मधील दूतावास बंद केलेत व येथील सरकारांनी आपल्या जनतेस युद्धासाठी सज्ज होण्याचे आदेश दिलेत. अमेरिकेने देखील आपला कीवमधील दूतावास बंद केला आहे.