आंध्र : नवदाम्पत्यास गिफ्ट देण्यास स्टेजवर गेला; छातीत कळ आल्याने कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11 hours ago
आंध्र : नवदाम्पत्यास गिफ्ट देण्यास स्टेजवर गेला; छातीत कळ आल्याने कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू

कर्नूल : आंध्र प्रदेशातील कर्नूलमध्ये आपल्या जिवलग मित्राच्या लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या एका तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर तरूणास तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले.  ही घटना लग्नसोहळा शूट करणाऱ्या कॅमेऱ्यात कैद झाली व येथून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. 


समोर आलेल्या माहितीनुसार, बंगळूरु येथे ॲमेझॉनमध्ये काम करणारा एल. वामसी नावाचा तरुण आपल्या जिवलग मित्राच्या  लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. त्याने लग्नसमारंभात आपल्या इतर मित्र मैत्रिणींसोबत धमाल केली. काही वेळाने तो नव दाम्पत्याचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत स्टेजवर गेला. दोघांचे अभिनंदन करून त्यांना गिफ्ट देत फोटोही काढले. अचानक त्याच्या छातीत तीव्र कळ आल्याने तो खाली खाली बसणार इतक्यात त्याच्या एका मित्राने त्याला पडण्यापासून वाचवले व जवळच्याच खुर्चीवर बसवले. येथे तो बेशुद्ध पडला. दरम्यान त्याला नजीकच्याच एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.  हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यानेच त्यांचे निधन झाल्याचे निदान झाले. 


Heart attack - Heart Research UK


अलीकडील काळात अतिजलद पण बैठी जीवनशैली, प्रदूषण, मानसिक ताणतणाव आणि त्यामुळे वाढणारा उच्च रक्तदाब, आहारात फास्टफूडवर भर यामुळे तरुण पिढीत देखील हृदयविकारची प्रकरणे लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. तरुण स्टेरॉईड्सचे सेवनदेखील सढळ हस्ते करताना दिसून येतात. यामुळे जिममध्ये व्यायाम करताना किंवा इतर परिस्थितीत हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढते. 


हेही वाचा