एआय क्षेत्रात भारताची उत्पादन क्षमता पाश्चात्य देशांपेक्षा किमान ३९ टक्के अधिक
बंगळुरू : भारतातील आयटी सेक्टर, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि मनोरंजन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आजकाल नॉर्मल झाला आहे. भारतातील इंटरनेटशी निगडीत सुविधा अत्यल्प किमतीत मिळत असल्याने सर्वसामान्य देखील तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सृजनशील गोष्टी निर्माण करतात. प्रोग्रामिंग आणि कोंडींग क्षेत्रात भारताने पाश्चात्य देशांना केव्हाच मागे टाकले आहे.
दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या एका ताज्या अहवालानुसार भारतात आयटी आणि अभियांत्रिकी सेक्टरमध्ये काम करणारे तब्बल ४६ टक्के लोक अतिप्रगत आणि प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दैनंदिनी वापरात करतात. मनोरंजन क्षेत्रात हे प्रमाण लक्षणीय ७८ टक्के आहे. एका माहितीनुसार हॉलीवूडमधील तब्बल ५० टक्के अॅनिमेशन आणि व्हीएफएक्सचे मेगाप्रोजेक्ट्स भारतातील तंत्रज्ञांकडे आफ्टरइफेक्टससाठी आउटसोर्स केले जातात. वैद्यकीय क्षेत्रात अलीकडेच याचा शिरकाव झाला असला तरीही एआय-रोबोटिक्सचा वापर डेंटल, ऑप्थाल्मोलॉजी आणि कर्करोगाशी निगडीत क्षेत्रात सध्या ३८ टक्क्यांपर्यंत करण्यात येत आहे.
टीम कोलॅबोरेशन आणि प्रोडक्टिविटी सॉफ्टवेअरमध्ये जागतिक पातळीवर आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या अटलासियनच्या ताज्या अहवालानुसार, प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात भारत अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या किमान ५ वर्षे पुढे आहे. अहवालानुसार, भारतानंतर ३४ टक्के अमेरिकन तंत्रज्ञांना प्रगत AI चे ज्ञान आहे, तर या बाबतीत जर्मनीचा वाटा ३२ टक्के आहे. फ्रान्समधील २६ टक्के तंत्रज्ञांना प्रगत AI चे ज्ञान आहे, तर ऑस्ट्रेलियातील केवळ २३ टक्के तंत्रज्ञांना AI चे प्रगत ज्ञान आहे.
एआय प्रणाली अंगिकारल्याने भारतीय तंत्रज्ञांच्या काम करण्याच्या पद्धतीत बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. अहवालानुसार भारतातील १ तंत्रज्ञ कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या स्टेज १ टूलचा वापर करून एका प्रोजेक्टवर किमान १०४ मिनिटे वाचवतो. जागतिक स्तरावरील हीच आकडेवारी ४५ मिनिटे आहे. याचप्रमाणे अतिप्रगत स्टेज ४ टूलचा वापर करत १ भारतीय तंत्रज्ञ प्रतिदिवस १२७ ते १३० मिनिटे वाचवू शकतो. याचमुळे भारताची उत्पादन क्षमता पाश्चात्य देशांपेक्षा किमान ३९ टक्के अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल तयार करण्याआधी जगातील विविध देशांतील तंत्रज्ञांची चाचणी घेण्यात आली. यातील भारतीय तंत्रज्ञ सर्वाधिक सर्जनशील निघाले. त्यांच्यानुसार, त्यांनी जेवढा वेळ हे तंत्रज्ञान शिकण्यात घालवला टॉ पूर्णतः स्तकर्मी लागला.
भारतीय आयटी सेक्टरमधील कंपन्या या प्रॉडक्टीव्हिटी बेस्ड कार्यप्रणालीवर काम करण्यास प्रोत्साहन देतात. यामुळे उत्पादन क्षमतेत इतरांपेक्षा अधिक सरस ठरतात. बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देतात. यामुळे यात काम करणारे तंत्रज्ञ काही प्रमाणात अपयश आले तरी झोकून काम करतात. भारतात निर्माण होणारे आयटी सोल्यूशन्स तांत्रिक दृष्ट्या कमी किचकट असतात यामुळे गेल्या काही काळात भारतात निर्माण झालेल्या आयटी सोल्यूशन प्रॉडक्टना आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली किमत मिळत आहे. एका अंदाजानुसार भारतातील ६५.३६ टक्के आयटी सोल्यूशन प्रॉडक्ट हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांना विकले जाते. भारत सरकारने देखील विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी नव्या योजना सुरू केल्याने येत्या काळात भारतात एआय चांगलाच फोफावणार आहे.