जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
नवी दिल्ली : युजीसी नेटच्या डिसेंबर सत्रासाठी अधिकृत वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर जाऊन यासाठी अर्ज करू शकतात. अधिसूचनेतून मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे, इच्छुक उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करावेत. परीक्षा १ ते १९ जानेवारी दरम्यान होणार आहेत.
अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे?
* एनटीए पात्रता निकषांनुसार, सामाजिक विज्ञान, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक विज्ञान इत्यादी विषयांमध्ये किमान ५५ टक्के गुण आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेस अर्ज करण्यास पात्र आहेत.
*वयोमर्यादा: जेआरएफसाठी उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. पीएचडी आणि असिस्टंट प्रोफेसरच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा नाही.
*या विषयांवर अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
उमेदवार खाली दिलेल्या माहितीनुसार यूजीसी नेट डिसेंबर सत्रासाठी अर्ज करू शकतात.
* प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
*यानंतर मुख्यपृष्ठावरील संबंधित अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
* येथे सर्वप्रथम आपली नोंदणी करा.
*हे केल्यानंतर, तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करा.
*आता आपला अर्ज भरा.
*अर्ज भरल्यानंतर, उमेदवारांनी तो एकदा पूर्णपणे तपासावा आणि नंतर सबमिट वर क्लिक करावे.
*शेवटी डाउनलोड करत प्रिंट आउट घ्या.