उत्तराखंड : बाटलीत ठेवलेले 'टॉयलेट क्लीनर' दारू समझून प्यायला; वृद्धाचा नाहक बळी गेला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th November, 12:23 pm
उत्तराखंड : बाटलीत ठेवलेले 'टॉयलेट क्लीनर' दारू समझून प्यायला; वृद्धाचा नाहक बळी गेला

डेहराडून : उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात दारूच्या नशेत एका वृद्धाने 'टॉयलेट क्लिनर' प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला. ६७ वर्षीय भगवान सिंग असे मृताचे नाव असून तो येथील जामला गावातील रहिवासी होता. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भगवान सिंह रविवारी रात्री त्यांच्या भाचीच्या लग्न समारंभात सहभागी होऊन घरी परतले पण ते मद्यधुंद अवस्थेत होते. घरात टॉयलेट क्लीनर पाण्याच्या काचेच्या बाटलीत ठेवला होता. मद्यधुंद अवस्थेत सिंह यांनी चुकून 'टॉयलेट क्लीनर' दारू आहे असे समजून प्यायले. टॉयलेट क्लिनर प्यायल्यानंतर सिंग यांची तब्येत बिघडू लागली, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना गावापासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पौरी जिल्हा रुग्णालयात आणले. येथे सिंह यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. भगवान सिंह यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

उत्तराखंडमधील अनेक डोंगराळ जिल्ह्यांमध्ये लग्नसमारंभात  पाहुण्यांना दारू देण्यावर बंदी आहे. नियम न पाळल्यास संबंधित कुटुंबाला दंड ठोठावण्याची तरतूद आहे. १५ नोव्हेंबर रोजी उदरी गावचे ग्रामप्रमुख भागचंद बिश्त यांच्या नेतृत्वाखाली महिला मंगल दलासह ग्रामस्थांनी एक बैठक आयोजित केली होती. येथे जो कोणी दारू पिईल त्याला ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल एकमताने असा निर्णय घेण्यात आला. याशिवाय त्या कुटुंबावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा