एलडीसीची २३२ पदे; ज्युनियर स्टेनोग्राफरची ५३ पदे भरणार
पणजी : राज्य कर्मचारी भरती आयोगाकडून विविध खात्यात एलडीसी/रिकव्हरी क्लार्क व ज्युनियर स्टेनोग्राफर मिळून २८५ पदांंसाठी जाहिरात देण्यात आली आहे. राज्यात नोकरीसाठी पैसे देण्याची प्रकरणे गाजत असतानाच ही जाहिरात देण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी १३ डिसेंबर २०२४पर्यंत अर्ज सादर करावे लागतली.
१९२५ रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच जाहिराती देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. यानंंतर जारी झालेली ही पहिली जाहिरात आहे. सीबीटी परीक्षेतील गुणांंच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
इच्छुकांंना ऑनईन पद्धतीने १३ डिसेंबर २०२४पर्यंत अर्ज सादर करावे लागतील. अर्ज भरण्यासाठी आवश्यक सूचना, पात्रता, शुल्क तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम याची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
एलडीसी पदांसाठी प्रत्येकी ६० गुणांचे दोन पेपर (सीबीटी) होणार आहेत. प्रत्येक पेपरसाठी ७५ मिनीटांचा कालावधी असेल.