पोलिसांनी जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या.
फोंडा : नंद्रण-मोले येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास गस्तीवर असताना बेवारस स्थितीत दारू कुळे पोलिसांना आढळून आली. अंदाजे १६ हजार रुपये किमतीच्या ६४ दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. सदर दारू अज्ञाताकडून कर्नाटक राज्यात नेण्यासाठी ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कुळे पोलिसांना मंगळवारी रात्री राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला लपवून ठेवलेल्या ६४ दारूच्या बाटल्या आढळल्या. अज्ञातांनी सदर दारू कर्नाटक राज्यात नेण्यासाठी लपवून ठेवण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी कुळे पोलीसांनी जप्त केलेल्या बाटल्या सांगे अबकारी खात्याकडे सुपूर्द केल्या असून कुळे पोलीस तपास करीत आहे.