हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. लेबनॉनमधील टायर भागात इस्रायलने रविवारी जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा मुख्य प्रवक्ताही ठार झाला आहे. उत्तरी गाझामध्ये देखील इस्त्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर पुन्हा एकदा हल्ला झाला झाला असून या हल्यात बेंनामिन नेतन्याहू हे थोडक्यात बचावले आहेत. हिजबुल्लाहने डागलेले दोन रॉकेट त्यांच्या घराजवळील सिझेरियात कोसळले.
हिजबुल्लाहने शुक्रवारी लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने दोन रॉकेट डागले. दोन्ही रॉकेट नेतन्याहू यांच्या घराच्या बागेत कोसळले. या हल्ल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. या घटनेनंतर इस्रायलच्या लष्कराने तात्काळ या भागाची सुरक्षा वाढवली असून या हल्ल्याचा तपास सुरू केला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. इस्रायलने हिजबुल्लावरील हल्ले तीव्र केले आहे. तर हिजबूल्लाने देखील इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले वाढवले आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये दोन्ही देशांमध्ये सीमेवर अनेक वेळा संघर्ष झाला आहे. हल्ल्यांची ही ताजी मालिका आहे. इस्रायलने या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून त्याचे परिमाण हिजबुल्लाहला भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे.
हल्ल्याच्या वेळी नेतन्याहू आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. त्यामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. शिन बायत यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ परिसराला घेराव घातला आणि तपास सुरू केला. इराणच्या भूमीवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याला इराण इस्रायलला चोख प्रत्युत्तर देईल, अशी ग्वाही इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली.
इरना या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. इराणमधील लष्करी तळांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या इराणी हवाई दलाच्या सदस्याच्या कुटुंबीयांसमवेत झालेल्या बैठकीत इराणच्या लष्कराचे कमांडर इन चीफ अब्दुलरहीम मौसावी यांनी हे वक्तव्य केले आहे. आम्ही हल्ल्याची वेळ आणि पद्धत ठरवत आहोत आणि गरज पडल्यास आम्ही हयगय न करता थेट हल्ला करणार, असे ते म्हणाले. आमच उत्तर हे चोख राहील असे इराणने म्हटले आहे.
- गणेशप्रसाद गोगटे