टी-२०मध्ये गोवा पोलिसांची गोवा पत्रकारांवर मात

२६ धावांनी मिळवला विजय : संचित कांदोळकरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th November, 09:12 pm
टी-२०मध्ये गोवा पोलिसांची गोवा पत्रकारांवर मात

पणजी : पर्वरी येथील जीसीए मैदानावर रविवारी झालेल्या २० षटकांच्या मित्रत्वाच्या क्रिकेट सामन्यात गोवा पोलिसांनी गोवा पत्रकार संघावर २६ धावांनी विजय मिळवला. गोवा पोलिसांनी १८७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. त्यांनी २० षटकांत ६ बाद १८६ धावा केल्या. शैलेश झांट्ये (५३ धावा) आणि प्रसाद पाटील (३३ धावा) यांचे भक्कम योगदान असतानाही गोवा पत्रकार संघाला ६ बाद १६० धावांपर्यंतच मजल मारता आली.


गोवा पोलिसांकडून संचित कांदोळकरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी डावाला मजबूती प्रदान करणारी होती, ज्यामुळे त्यांना आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. भक्कम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर गोवा पोलिसांच्या गोलंदाजांनी गोवा पत्रकार संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखले.

६ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारत गोवा पोलिसांच्या गोलंदाजांनी गोवा पत्रकार संघाला लक्ष्याच्या जवळ पोहोचू दिले नाही. तगडी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे गोवा पत्रकार संघाचा पाठलाग रोखला गेला. झांट्ये आणि पाटील यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे गोवा पत्रकार संघाला ६ बाद १६० धावा करणे शक्य झाले. गोवा पोलिसांना २६ धावांनी विजय मिळवला.

पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवले आपले कौशल्य

अक्षत कौशल (एसपी नॉर्थ क्राइम), ओमवीर सिंग (महानिरीक्षक), महासंचालक आलोक कुमार, राहुल गुप्ता (एसपी सायबर क्राईम), डीवायएसपी विश्वेश कर्पे आणि क्राइम ब्रँचचे पीआय राहुल परब यांनीही या सामन्यात आपले क्रिकेट कौशल्य दाखवले.