यूपी : 'तुला आणि कोर्टाला एकत्र उडवू..' अलाहाबाद उच्च न्यायालयाला पाकिस्तानी क्रमांकावरून धमकी

अलाहाबाद उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी खटल्यातील पक्षकार आशुतोषला पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सॲपवर रेकॉर्डिंग पाठवून धमकी देण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11 hours ago
यूपी : 'तुला आणि कोर्टाला एकत्र उडवू..' अलाहाबाद उच्च न्यायालयाला पाकिस्तानी क्रमांकावरून धमकी

लखनौ : देशात गेल्या अनेक महिन्यांपासून कॉल्स आणि मेसेजच्या माध्यमातून रेल्वे, विद्यालये, विमाने-विमानतळे, मंदिरे तसेच अनेक सेलेब्रिटींना लक्ष्य करत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. बऱ्याचदा या धमक्या फुसक्या निघाल्याचे तपासाअंती उघड झाले आहे. दरम्यान  श्रीकृष्ण जन्मभूमी खटल्यातील पक्षकार आशुतोषला व्हॉट्सॲपवर रेकॉर्डिंग पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयात बॉम्बस्फोटाची धमकी

धमकी देणाऱ्या व्यक्तीने बुधवारी (१३ नोव्हेंबर) रात्री पाकिस्तानच्या एका नंबरवरून 'तू कोर्टात जा, तुला आणि कोर्टाला एकत्र उडवू', असे ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवले. रेकॉर्डिंग पाठवणाऱ्या व्यक्तीने  बोलले आहेत. धमकीचे रेकॉर्डिंग मिळाल्यानंतर आशुतोषने शामली पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

आशुतोष श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्षही आहेत. बुधवारी रात्री ९.३० वाजता आशुतोषला व्हॉट्सॲपवर २२ ऑडिओ रेकॉर्डिंग मिळाले. हे सर्व पाकिस्तानच्या क्रमांक +९२ ३०२ ९८५४२३१ वरून पाठवण्यात आले होते. मागेच आशुतोष पांडे यांनी शाही ईदगाह येथे वीज चोरी सुरू असल्याची तक्रार केली होती. तक्रारीवरून वीज विभाग आणि पोलिसांनी शाही ईदगाहच्या सचिवावर कारवाई केली होती. आशुतोष पांडेंना यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. प्रयागराज, कौशांबी, फतेहपूर आणि मथुरा येथे याबाबत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

हेही वाचा