महाराष्ट्र : वासना भागवण्यासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीसमोरच हीरे व्यापाऱ्याला हार्ट अटॅक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th November, 02:45 pm
महाराष्ट्र : वासना भागवण्यासाठी आणलेल्या अल्पवयीन मुलीसमोरच हीरे व्यापाऱ्याला हार्ट अटॅक

मुंबई :  मायानगरीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वासना भागवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो याचीच प्रचिती पुन्हा आली आहे. आपल्या मुलीच्या वयाच्या असलेल्या अल्पवयीन मुलीशी ठेवलेल्या शारीरिक संबंधांदरम्यान गुजरात मधून मुंबईत आलेल्या एका हीरेव्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या अल्पवयीन मुलीचे वय अवघे १४ वर्षे आहे आणि तिला या व्यापाऱ्याने खास याच कामासाठी मुंबईत आणले होते अशी माहिती समोर आली आहे.  


12 People Name The Best City To Live In India According To Them & There's A  Legit Debate Going On


दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. ही घटना गेल्या आठवड्यात घडल्याची माहिती समोर आली आहे. सेक्स दरम्यान वायग्राच्या सेवनाने त्याच्या हृदयाचे ठोके वाढले असावेत व त्याचमुळे त्याला तीव्र झटका येत त्याचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सदर घटना मागील शनिवारी घडली होती. पोलिसांनी मुलीची चौकशी करत तिला ताब्यात घेऊन तिच्या आईला याबाबत माहिती दिली. 


Mumbai Crime News : 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करताना डायमंड फॅक्ट्रीच्या  मॅनेजरचा मृत्यू! नेमका प्रकार काय? - mumbai crime news diamond company  manager dies after abusing minor ...


आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत्यू पावलेला वासनांध व्यापारी अल्पवयीन तसेच तरुण मुलींना आपल्या हीऱ्यांच्या दागिन्यांच्या आस्थापनात नोकरीचे आमिष दाखवून त्यांना मुंबईत घेऊन येत त्याचे शोषण करत होता. गरजू मुलींचा शोध घेण्यासाठी त्याला काहीजण मदत करायचे. आतापर्यंत या व्यापाऱ्याने व त्याच्या दलालांनी अनेक मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूने सुदैवाने भविष्यात इतर मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे.  दरम्यान पोलीस त्याच्या कुटुंबियांची देखील तपासणी करत आहेत.   


Mumbai Tragedy: 13-Year-Old Girl Dies By Suicide After Jumping From 47th  Floor Of Lodha World Crest In Lower Parel


दरम्यान घटनेचे तपासकार्य पाहणाऱ्या मुंबईतील डीबी मार्ग पोलीस स्थानकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मूळ गुजरातमधील या मुलीच्या आईने हीरे व्यापाऱ्याविरुध्द तसेच दलालाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यात आपल्या मुलीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने मुंबईत नेण्यात आल्याचा आरोप केला होता. दरम्यान पोलिसांनी तपासचक्रे गतिमान  करत या व्यापाऱ्याला मुली पुरवणाऱ्या दलालांची माहिती काढली असून त्यांच्या विरोधात पॉक्सो कायदा तसेच अपहरण आणि बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

UCN News Live | Live News in Nagpur | Vidharbha News
हेही वाचा