तब्बल ५४ दिवसांनंतर इस्रायलने स्वीकारली पेजर-वॉकी-टॉकी हल्ल्याची जबाबदारी

ओमर यांनी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली नाही

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th November, 10:32 am
तब्बल ५४ दिवसांनंतर इस्रायलने स्वीकारली पेजर-वॉकी-टॉकी हल्ल्याची जबाबदारी

जेरुसलेम: सप्टेंबरमध्ये लेबनॉनमधील पेजर स्फोटांच्या मालिकांची जबाबदारी इस्रायलने ५४ दिवसांनंतर स्वीकारली आहे. इस्रायलच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान नेतन्याहू यांनी रविवारी या हल्ल्याला मान्यता दिल्याचे मान्य केले. नेतन्याहूचे प्रवक्ते ओमर दोस्ती यांनी न्यूज एजन्सी एएफपीला सांगितले कि, रविवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत पीएम नेतन्याहू यांनी लेबनॉनमध्ये पेजर हल्ल्याचा आदेश दिल्याची पुष्टी केली. मात्र, ओमर यांनी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.

टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, नेतन्याहू म्हणाले की, संरक्षण एजन्सी आणि वरिष्ठ अधिकारी पेजर हल्ला आणि हिजबुल्लाहचा तत्कालीन प्रमुख नसराल्लाहला मारण्याच्या कारवाईच्या विरोधात होते. विरोध असतानाही मी हल्ल्याचे थेट आदेश दिले.१७ सप्टेंबर रोजी पेजर स्फोट आणि १८ सप्टेंबर रोजी वॉकी-टॉकी हल्ल्यात हिजबुल्लाशी संबंधित सुमारे ४० लोक मारले गेले आणि तीन हजारांहून अधिक लोक जखमीही झाले होते.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रायली नेत्यांना नसराल्लाहच्या स्थानाची अनेक महिन्यांपासून माहिती होती. त्यांनी एक आठवडा अगोदरच त्याच्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती. किंबहुना, काही दिवसांत नसराल्लाह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतील, अशी भीती इस्रायली अधिकाऱ्यांना वाटत होती.

अशा परिस्थितीत त्याच्यावर हल्ला करायला त्यांच्याकडे फारच कमी वेळ होता. यानंतर २७ सप्टेंबर रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी UN मध्ये भाषण दिल्यानंतर त्यांच्या हॉटेल रूममधून हिजबुल्लाच्या मुख्यालयावर हल्ला करण्याची परवानगी दिली.

पेजर :-

पेजर हे एक वायरलेस उपकरण आहे जे संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी वापरले जाते. हे सहसा लहान स्क्रीन आणि मर्यादित कीपॅडसह येते. त्याच्या मदतीने मेसेज किंवा अलर्ट पटकन मिळू शकतात.

हेही वाचा