रशिया आणि उत्तर कोरियात एक तह झाला असून याअंतर्गत उत्तर कोरियाचे दहा हजार सैनिक रशियात युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी पोहोचले आहेत. दरम्यान येथे इतर सर्व सुखसोयींसह इंटरनेटची सुविधाही देण्यात आली आहे. मात्र याचा रशियनसैन्याला फटका बसला आहे. उत्तर कोरियाच्या अनेक सैनिकांना पॉर्न पाहण्याचे व्यसन लागले आहे. यामुळे रशियाच्या लष्कर प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे.
मॉस्को : रशियात तैनात उत्तर कोरियाच्या सैनिकांना प्रथमच इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. तेव्हापासून हे सैनिक सतत पॉर्न साइटला भेट देत आहेत. काही सैनिकांना पॉर्न फिल्म पाहण्याचे व्यसनच लागले आहे. अशा परिस्थितीत या जवानांच्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
उत्तर कोरियामध्ये इंटरनेटवर कडक नियंत्रण आहे आणि तिथले नागरिक केवळ सरकारी-नियंत्रित कंटेंट पाहू शकतात, परंतु रशियामधील या स्वातंत्र्यामुळे उत्तर कोरियन सैनिकांना रानच मोकळे झाले आहे. माहितीनुसार रशिया आणि उत्तर कोरियात एक तह झाला असून याअंतर्गत उत्तर कोरियाचे दहा हजार सैनिक रशियात युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी पोहोचले आहेत. दरम्यान येथे इतर सर्व सुखसोयींसह त्यांना इंटरनेटची सुविधाही देण्यात आली आहे. मात्र याचा फटका रशियन सैन्याला बसला आहे. उत्तर कोरियाच्या अनेक सैनिकांना पॉर्न पाहण्याचे व्यसन लागले आहे. यामुळे रशियाच्या लष्कर प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे.
यापैकी बरेच सैनिक रशियाच्या कुर्स्क प्रदेशात असलेल्या दुर्गम भागात तैनात आहेत, येथे युक्रेनियन सैन्य सर्वात जास्त सक्रिय आहे. गेल्या १ महिन्यांत तब्बल ४ कोटी वेळा इंटरनेटचा वापर अश्लील सामग्री पाहण्यासाठी एकट्या या कुर्स्क प्रदेशातून झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रदेश अतिथंड आणि निर्जन आहे. येथे फक्त ४०० लोक राहतात आणि त्यांच्याकडे इंटरनेट सोडाच, मूलभूत सुखसोयींची देखील वानवा आहे. यामुळे साहजिकच हा संशय कोरियन सैनिकांवर जात आहे. साहजिकच त्यांच्यासाठी हा एक नवीन अनुभव आहे, कारण उत्तर कोरियामध्ये अशा प्रकारचे साहित्य पाहिल्यास कठोर शिक्षा दिली जाते.
उत्तर कोरियाच्या हुकूमशाही सरकारचे देशातील डिजिटल आणि सोशल मीडियावर पूर्ण नियंत्रण आहे. परदेशी कंटेंट पाहणे किंवा शेअर करणे येथे गुन्हा आहे. काही वेळा यासाठी फाशी देखील दिली जाते. प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातील नोंदीनुसार उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अलीकडेच त्यांच्या देशात एक विशेष पथक तयार केले आहे व याचे काम विदेशी कंटेंट पाहणाऱ्या किंवा शेअर करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणे आहे. दरम्यान हा प्रकारांमुळे रशियन सैन्याची नाचक्की होत आहे.
दरम्यान एकेकाळी अमेरिकेत देखील हा प्रकार घडला होता. अफगानिस्तानमध्ये तैनात सैनिक पॉर्नच्या आहारी गेले होते. विशेष म्हणजे अमेरिकेने लढवलेली एक शक्कल त्यांचाच अंगलट आली. २००७-०८ च्या दरम्यान अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात लपलेले अतिरेकी शोधणे कठीण बनले होते. दरम्यान अमेरीकन सुरक्षा समितीच्या एका सेशनमध्ये यावर काहीसा विचित्र तोडगा काढण्यात आला. त्यांनी या भागांत सॅटेलाइटद्वारे अनलिमिटेड इंटरनेट देण्याचे ठरवले.
दरम्यान दोन महिन्यात या दुर्गम भागांत सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात आली. याच्या एका महिन्यानंतर या भागातील इंटरनेट वापरायचा डेटा गोळा करण्यात आला. ही सुविधा उपलब्ध होताच येथील डोंगर कपाऱ्यांत लपलेल्या अतिरेक्यांनी सर्वप्रथम पोर्न साइट्सना भेट दिली होती. डेटाच्या माध्यमातून समोर आलेल्या लोकेशन आणि आकड्यांच्या मदतीने अमेरिकन सैन्याने धडक कारवाई करत तब्बल १२० हून अधिक अतिरेकी ठार केले.
दरम्यान काही काळानंतर ही यंत्रणा अमेरिकेच्या अंगलट आली. अमेरिकन सैनिक देखील पोर्नच्या आहारी गेले.तेव्हापासून दर तीन ते सहा महिन्यांनी सैनिकांची नवीन तुकडी पाठवून जुन्या तुकडीला माघारी बोलावले जाते. पण सध्या रशियात जे काही होत आहे ते चिंताजनक आहे. ही बाब रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील लष्करी संबंधांबाबत एक प्रमुख मुद्दा आहे. अमेरिका सैनिकांच्या इंटरनेट वापरावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा या आघाडीच्या सुरक्षेच्या बाबींवर अधिक लक्ष देत आहे, असे यूएस संरक्षण विभागाचे प्रवक्ते मेजर चार्ली डीट्झ यांनी सांगितले. रशियासाठी हे सैनिक आता डोईजड झाले आहेत.