दुमका विधानसभा मतदारसंघात यंदा झेडएमएम, काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची निवडणूक
रांची : झारखंडच्या दुमका विधानसभा मतदारसंघात यंदा झेडएमएम, काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची निवडणूक होणार आहे. वसंत सोरेन आणि सुनील सोरेन यांच्यात थेट लढत होईल, तर शिकारीपाडा आणि जरमुंडीमध्येही जोरदार मुकाबला आहे. झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत नेण्यात दुमका जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. याच .जिल्ह्यातील चारही जागा २०१९ च्या निवडणुकीत झेडएमएम आणि कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या. तीन ठिकाणी झेडएमएम तर एका ठिकाणी कॉंग्रेसचा झेंडा फडकला होता. दुमका, शिकारीपाडा, जामा विधानसभा मतदारसंघावर जेएमएम तर जरमुंडी मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. या निवडणुकीत भाजपला दमकाची जागा गमवावी लागली होती. झेडएमएमने दुमकाची जागा भाजपकडून हिसकावून घेतली. जरमुंडी जागेवर कॉंग्रेसच्या बादल यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता.
आता जरमुंडीत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात थेट मुकाबला आहे. दुमका जिल्ह्यातील जरमुंडी विधानसभा मतदारसंघात ‘इंडिया’ आघाडीतील जेएमएम, कॉंग्रेस, राजद यांचा संयुक्त उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे अमादार, माजी मंत्री बादल पत्रलेख यांना तिसऱ्यांदा मैदानात आणले आहे. २०१४-१०१९ मध्ये कॉंग्रेस मध्ये कॉंग्रेसच्या बादल यांनी भाजपच्या देवेंद्र कुंवर यांना सुमारे तीन हजार मतांनी पराभूत केले. यावेळी देखील बादल यांच्यावर विश्वास ठेवला आहे.भाजपने देंवेंद्र कुंवर यांना देखील तिसऱ्यांदा मैदानात उतरविले असून देवेंद्र कुंवर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
अनेकदा दुमका जागेवर झामुमो आणि भाजप यांच्यात थेट मुकाबला राहिला आहे. यावेळी भाजपच्या लुईस मरांडी यांच्याऐवजी माजी खासदार सुनील सोरेन यांना मैदानात उतरविले आहे. त्याचवेळी झेडएमएमने वसंत सोरेन यांना समोर आणले आहे. पण तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या लुईस मरांडी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत झामुमो पक्षात प्रवेश केला आहे. आता बदलत्या राजकारणात दुमका मतदारसंघात ‘इंडिया’ आघाडीचे अधिकृत उमेदवार झामुमोचे वसंत सोरेन आणि भाजपच्या सुनील सोरेन यांची अग्निपरीक्षा होणार आहे.