निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर समर्थनासाठी १७ अटी ठेवत म्हणाले- 'आरएसएसवर बंदी घालावी'
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया उलेमा बोर्डाने मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संघावर वर बंदी यांसारख्या १७ अटी घातल्या आहेत. ७ नोव्हेंबर रोजी बोर्डाने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिले.
जर महाराष्ट्रात एमव्हीए सरकार स्थापन झाले तर त्यांनी वक्फ विधेयकाला विरोध करावा. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात यावी. महाराष्ट्रातील मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करावी आणि मुस्लिमांविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितीश राणेंसारख्या नेत्यांवर कारवाई व्हावी अश्या मागण्या मंडळाने केल्या आहेत.
दुसरीकडे भाजपने धर्मावर आधारित आरक्षणाच्या मागणीवर आक्षेप घेतला. 'संविधानानुसार धर्मावर आधारित आरक्षणाला परवानगी नाही, मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले कसे जमियत उलेमा-ए-हिंदला मुस्लिमांसाठी १० टक्के आरक्षणाच्या त्यांच्या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन देतात?असा प्रश्न खासदार रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. भाजप महायुतीसोबत निवडणूक लढवत आहे. भाजपने १४८ जागांवर, शिंदे गटाने ८० जागांवर तर अजित पवार गटाने ५३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर उर्वरित जागा छोट्या पक्षांना देण्यात आल्या आहेत.
या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने समर्थन दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीसाठी काम करावे असं म्हटले आहे. मात्र आता हे पत्र खोटेअसल्याची माहिती शरद पवार गटाने दिले आहे.या पत्रावर जयंत पाटील यांनी खोटी स्वाक्षरीदेखील आहे. पहा पोस्ट'
जाणून घ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत किती मुस्लिम उमेदवार आहेत
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी एकूण ४,१४० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी मुस्लिम उमेदवारांची संख्या अल्प आहे. महायुतीबाबत बोलायचे झाले तर भाजपने एकाही मुस्लिम नेत्याला तिकीट दिले नाही. शिंदे गटातील शिवसेनेने एक मुस्लिम उमेदवार उभा केला आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चार मुस्लिम नेत्यांना तिकीट दिले आहे.
महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उद्धव गटाने एकही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही, तर काँग्रेसने आठ, राष्ट्रवादी-शरद गटाने आणि सपाने प्रत्येकी एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले आहे. त्याच वेळी, ओवेसींचा पक्ष एआयएमआयएमने निवडणुकीत १४ उमेदवार उभे केले आहेत, त्यापैकी १० मुस्लिम आहेत.