श्री विठ्ठल रखुमाईची पालखी, नौकायन स्पर्धा तसेच गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचे प्रदर्शन घडवणारे अनेक कार्यक्रम असतील प्रमुख आकर्षण
पणजी : विठ्ठलापूर-साखळी येथे वाळवंटी नदीकिनारी १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येईल. गोव्याच्या परंपरा व संस्कृतीचे दर्शन पर्यटक तसेच स्थानिकांनाही व्हावे यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने एक टूर आयोजित केली आहे.
पर्यटन संचालक तथा जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस, यांनी या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत, एका अभूतपूर्व अनुभवाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांना आमंत्रित केले आहे. 'पर्यटकांना गोव्याच्या संस्कृतीशी एकरूप होता यावे यासाठी जीटीडीसीद्वारे नेहमीच विशेष उपक्रम राबवण्यात येतात याच अनुषंगाने साखळीत होणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विशेष कोच सेवा पर्यटकांसाठी ठेवली आहे. पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा' असे ते म्हणाले.
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे वाईटावर चांगल्याने मिळवलेला विजय. या उत्सवाची सुरुवात विठ्ठलापूर-साखळी येथे वाळवंटी नदीकिनारी भगवान श्रीकृष्णांच्या मिरवणूकने होईल नंतर वाळवंटी नदीपात्रात दीपदानाचा कार्यक्रम होईल. यानंतर सांस्कृतीक कार्यक्रमांच्या मेजवानीचा आनंद पर्यटकांना लुटता येईल. यानंतर श्री विठ्ठल-रखुमाईची पालखी मिरवणूक होईल व भाविकांना देवळात जात श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे नौकाविहार स्पर्धा. या स्पर्धेत आकर्षक आणि पर्यावरणपूरक नौका सहभागी होत असतात.
वाळवंटी नदीपात्रात रात्री ते मध्यरात्रीपर्यंत ही स्पर्धा रंगते. यंदाही याचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर 'त्रिपुरारीसुराचा वध' झाल्यानंतर आकाशात सारंगा सोडण्यात येणार आहे. दरम्यान गोव्यात होणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेशी जोडलेल्या अनेक कथा, परंपरांचा अनुभव येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांना घेता येणार आहे. तसेच गोव्याच्या समृद्ध लोककलेचे दर्शनही भाविकांना व पर्यटकांना घेता येईल.
जीटीडीसीद्वारे पर्यटकांसाठी पणजी, मिरामार आणि म्हापसा येथून विशेष वाहतूक सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधत बुकिंग करावे.
कोच खालील ठिकाणाहून सुटतील:
१. पणजी रेसिडन्सी:
७८८७८९७५२४
२. मिरामार रेसिडन्सी:
७८८७८९७५२६
३. म्हापसा रेसिडन्सी:
७८८७८९७५२३
टूरसाठी शुल्क तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी ९४२३८८३१३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.