मडगाव : कोलवा किनार्यावर फिरण्यासाठी आलेल्या रफीक अली यांच्या गळ्यातील चेन चोरीचा प्रयत्न करणार्या संशयित आदित्य आदेंद्र याला पर्यटक पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी कोलवा पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोलवा किनार्यावर रविवारी पर्यटकांची गर्दी होती. या गर्दीचा फायदा चोरांकडून घेण्याचा प्रयत्न झाला. कोलवा किनारी फिरण्यासाठी आलेल्या आर्लेम फातोर्डा येथील रफीक अली यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. किनारी भागात कार्यरत पर्यटक पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान सदर व्यक्ती महाराष्ट्रातील असून संशयिताचे नाव आदित्य दीपक आदेंद्र असल्याचे समजले. संशयिताकडून याबाबत संदिग्ध उत्तरे देण्यात आली. त्याला पर्यटक पोलिसांकडून ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी कोलवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.