फोंडा :सतरकर हत्येप्रकरणी पूजा नाईकला न्यायालयाने ठोठावली तीन दिवसांची पोलिस कोठडी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th November, 04:57 pm
फोंडा :सतरकर हत्येप्रकरणी पूजा नाईकला न्यायालयाने ठोठावली तीन दिवसांची पोलिस कोठडी

फोंडा : केरी- फोंडा येथील श्रीधर सतरकर यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांच्या अटकेत असलेल्या पूजा नाईक हिला फोंडा प्रथम वर्ग न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. यापूर्वी म्हार्दोळ पोलिसांनी पूजा नाईक हिला सरकारी नोकरी देण्याच्या बदल्यात लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी अटक केली होती.

 श्रीधर सतरकरच्या आत्महत्येप्रकरणी म्हर्दोळ पोलिसांनी पूजा नाईक हिच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला होता.यापूर्वी पूजा नाईक हिला  डिचोली व पर्वरी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी म्हर्दोळ पोलिसांनी तिला अटक करून रविवारी प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तीनी तीला ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. निरीक्षक योगेश सावंत या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.


हेही वाचा