बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियासाठी मोठे आव्हान

मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th November, 11:51 pm
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियासाठी मोठे आव्हान

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर अखेरीस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. सदर ट्रॉफी ऑस्ट्रेलियन भूमीवर होणार असून, टीम इंडियासाठी मोठे आव्हान असणार आहे. मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे.
स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, टीम इंडिया १० किंवा ११ नोव्हेंबरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी रवाना होणार आहे. मात्र, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याच्या तारखेची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियात लवकर जाणे टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण तेथे गेल्यानंतर खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सराव करू शकतील, जेणेकरून तेथील परिस्थितीनुसार खेळाडूंना स्वत:ला जुळवून घेता येईल.
घरच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला ०-३ ने व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियासाठी मोठे आव्हान ठरू शकते. अशा स्थितीत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक
‍पहिली कसोटी : २२ ते २६ नोव्हेंबर - पर्थ स्टेडियम, पर्थ
दुसरी कसोटी : ६ ते १९ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, अॅडलेड
तिसरी कसोटी : १४ ते १८ डिसेंबर - द गाबा, ब्रिस्बेन.
चौथी कसोटी : २६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पाचवी कसोटी : ३ ते ७ जानेवारी - सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर. अश्विन, आर. जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वाशिंग्टन सुंदर.