बर्च क्लब आग दुर्घटनाप्रकरणी लुथरा बंधूंना म्हापसा न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

बर्च क्लब आग दुर्घटनाप्रकरणी सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांना म्हापसा न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर. या एकाच प्रकरणात त्यांना जामीन मिळाला असून उर्वरित प्रकरणांची सुनावणी सुरू राहील.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
5 hours ago
बर्च क्लब आग दुर्घटनाप्रकरणी लुथरा बंधूंना म्हापसा न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

म्हापसा : बर्च क्लब आग दुर्घटनाप्रकरणी बर्च क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी एक लाख रुपयांच्या हमीवर आणि इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लुथरा बंधूंना याच एकाच प्रकरणातून जामीन मिळाला आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या आरोग्य खात्याच्या बनावट दाखला प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत राहणार. .

बर्च क्लब आग दुर्घटना आणि बनावट एनओसी प्रकरण 

६ डिसेंबर २०२५ रोजी 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबमध्ये भीषण आग लागून तब्बल २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मोठ्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी जेव्हा सखोल तपास सुरू केला, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. क्लबला मद्यविक्रीसाठी उत्पादन शुल्क (एक्साईज) परवाना मिळवताना कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा बनावट ना-हरकत दाखला वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून १७ डिसेंबर २०२५ रोजी म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला होता.

५० साक्षीदार आणि २,३०६ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल

या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी जुलै २०२६ मध्ये म्हापसा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यात 'जीएस हॉस्पिटॅलिटी एलएलपी'चे अधिकृत मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांच्यासह इतरांविरोधात आरोप करण्यात आले आहेत. यानंतर लुथरा बंधुनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. याला सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्यांचा जामीन रद्द करून शरण येण्यास सांगितले. त्यानुसार, १४ सप्टेंबर रोजी शरण आल्यानंतर लुथरा बंधुंनी जामीन अर्ज दाखल केले.न्यायालयाने याप्रकरणी १ लाख प्रत्येकी हमी व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. याप्रकरणी न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी दिला.  





हेही वाचा
सर्व पहा