पणजी : पणजी मार्केटमधील (Panjim market) बस स्थानकाजवळ फुटपाथवर झोपलेल्या एका मजुराला कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे सुमारे ३.१५ वाजता घडली. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या घटनेत फुटपाथवर झोपलेला मजूर कारच्या धडकेत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या प्रकरणी पणजी पोलिसांनी (Goa Police) कारचालक मनजीत सिंह याला याला निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी अटक केली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास पणजी पोलीस करीत आहेत.


