नागोया : जपानमधील ऐची-नागोया येथे रंगलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेची दिमाखात रविवारी सांगता झाली. या महाकुंभमेळ्यात भारत-पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील लढतींनी सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. क्रिकेट आणि हॉकी या दोन्ही खेळांमधील भारत-पाकिस्तान सामने आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिले गेलेले सामने ठरले आहेत, अशी अधिकृत माहिती ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाने (ओसीए) दिली आहे.
या स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत एकूण ८५ पदके (२१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य) आपल्या नावावर केली आणि पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले. २०२३ मधील हांगझू आशियाई स्पर्धेतील (१०७ पदके) विक्रमानंतर भारताची ही दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच हाय-व्होल्टेज राहिले आहेत. यावेळी या दोन्ही देशांमधील दोन सामने विशेष चर्चेत ठरले.
रोमांचक हॉकी उपांत्य सामना (१ ऑक्टोबर): कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानचा ४-३ असा रोमांचक पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती आणि पुढे सुवर्णपदकही जिंकले.
क्रिकेट अंतिम सामना (३ ऑक्टोबर): या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सलग दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
ओसीएच्या समन्वयक समितीचे अध्यक्ष तैय्यब इकराम यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, या स्पर्धेचे प्रसारण आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक पाहिले गेले. कालचा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आणि त्याआधीचा हॉकी सामना या क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेले सामने ठरले. मात्र, कोणता सामना सर्वाधिक पाहिला गेला, याबाबत त्यांनी नेमकी आकडेवारी जाहीर केली नाही.
यंदाच्या नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत पारंपारिक ‘गेम्स व्हिलेज’ नसल्याने खेळाडूंना राहण्याची आणि वाहतुकीची मोठी कसरत करावी लागली. १७ हजार खेळाडूंना हॉटेल रूम्स, तात्पुरते लाकडी कंटेनर आणि एका क्रूझ शिपवर सामावून घेण्यात आले होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा आणि भारताचे सेफ डी मिशन सहदेव यादव यांनीही या व्यवस्थेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
यावर स्पष्टीकरण देताना तैय्यब इकराम म्हणाले की, अशा बहु-क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात प्रशासकीय आव्हाने असतात हे आम्हाला माहीत आहे. काही तक्रारीही समोर आल्या, मात्र आम्ही त्या आव्हानांवर कशा प्रकारे मात केली हे महत्त्वाचे आहे. खेळाडूंना सर्वोत्तम वातारण, लॉजिस्टिक्स आणि सुविधा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता."
तसेच, गेम्स व्हिलेज नसलेल्या या नव्या मॉडेलचे खेळाडूंनी स्वागतच केले असून, भविष्यात मोठ्या खर्चाची ‘व्हाइट एलिफंट’ ठरणारी गावे उभारण्याऐवजी हा एक यशस्वी पर्याय ठरू शकतो, असेही ते म्हणाले.
नीरू ढांडा ध्वजवाहक
या समारोप सोहळ्यात भारताची स्टार नेमबाज नीरू ढांडा हिने अत्यंत अभिमानाने भारताचा तिरंगा ध्वज फडकवला आणि भारतीय पथकाचे नेतृत्व केले. या महाकुंभमेळ्यातील अंतिम आणि शेवटचे सुवर्णपदक सौदी अरेबियाचा इक्वेस्ट्रियन (घोडेस्वार) खेळाडू हमद अल-दुहामी याने शो जंपिंग प्रकारात जिंकले. सौदी अरेबियाच्याच अब्दुर्रहमान बादेर एम. अलराजही याने रौप्य पदक, तर कतारच्या मोहम्मद बासेम याने कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेच्या सांगतेसोबतच पुढील, २०२३ मधील आशियाई क्रीडा स्पर्धा कतारमधील दोहा येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ म्हणून गौरवण्यात आले. थायलंडचा धावपटू पुरीपोल बून्सन, चीनची अवघ्या १३ वर्षांची जलतरणपटू यू झिडी या दोघांना संयुक्तपणे यंदाचे ‘एमव्हीपी’ म्हणून घोषित करण्यात आले.
भारताची ऐतिहासिक कामगिरी
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पदकतालिकेत भारताने अत्यंत शानदार कामगिरी करत चौथे स्थान पटकावले. भारताने एकूण ८५ पदके आपल्या नावावर केली, ज्यामध्ये २१ सुवर्ण, २७ रौप्य, ३७ कांस्य पदकांचा समावेश होता. २०२३ च्या हांगझू आशियाई स्पर्धेत भारताने १०७ पदके जिंकली होती, त्यानंतरची भारताची ही आजवरची दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे.
मोडलेले विक्रम हेच उत्तम व्यवस्थेचा पुरावा: ओसीए संचालक
ओसीएचे महासंचालक हुसेन अल-मुसल्लाम यांनी खेळाडूंसाठी सर्वोत्तम वातावरण निर्माण केल्याचे सांगताना विक्रमांची आकडेवारी समोर ठेवली. ते म्हणाले की, या स्पर्धेत ५४ जागतिक विक्रम, ११ कनिष्ठ जागतिक विक्रम, ८९ आशियाई विक्रम आणि २१२ आशियाई क्रीडा स्पर्धांचे विक्रम मोडले गेले. जर खेळाडूंना चांगली झोप, चांगले अन्न आणि उत्तम वाहतूक मिळाली नसती, तर त्यांना अशी कामगिरी करणे शक्य झाले नसते. जपानने सर्व आव्हानांवर मात करून जगाला सर्वोत्तम आणि शांततापूर्ण स्पर्धा करून दाखवली आहे.
२०३० च्या स्पर्धेची कमान दोहाकडे सुपूर्द
जपानमधील ‘आइची-नागोया’ येथे रंगलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ चा आज दिमाखात समारोप झाला. या भव्य समापन सोहळ्यात आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेची अधिकृत कमान पुढील आयोजक देशाकडे सोपवण्यात आली. सोहळ्याच्या शेवटी कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल थानी यांच्याकडे आशियाई खेळांचा अधिकृत ध्वज आणि मशाल सोपवण्यात आली, ज्यानंतर कतारचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यानुसार, आशियाई क्रीडा स्पर्धेचा पुढील, म्हणजेच २०२१ नंतरचा २०२३० चा थरार दोहा, कतर येथे रंगणार आहे. अशा प्रकारे नागोया येथील अंतिम सोहळ्यासोबतच १६ दिवस चाललेल्या या क्रीडा महाकुंभमेळ्याची यशस्वी सांगता झाली असून, आता संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष २०२३० च्या दोहा आशियाई स्पर्धांकडे लागले आहे.
शेवटच्या दोन दिवसांत पालटले भारताचे संपूर्ण चित्र
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुरुवातीचा प्रवास काहीसा उतार-चढ़ावाचा राहिला. अगदी गुरुवारपर्यंत भारताच्या खात्यात केवळ १० सुवर्ण पदके जमा होती आणि भारतीय संघ पदक तालिकेत पहिल्या दहा संघांमधूनही बाहेर फेकला गेला होता.
मात्र, स्पर्धेच्या शेवटच्या दोन दिवसांत भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व आणि धडाकेबाज पुनरागमन करत अक्षरशः सुवर्णवेध घेतला. हॉकी आणि क्रिकेट या दोन्ही लोकप्रिय खेळांमध्ये भारताने सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले, तर नेमबाजी, तीरंदाजी, मुक्केबाजी आणि कुश्ती या क्रीडाप्रकारांमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताच्या पदकांची संख्या झपाट्याने वाढली. फक्त शेवटच्या दोन दिवसांत भारतीय खेळाडूंनी तब्बल ११ सुवर्ण पदके आपल्या नावावर केली. या जोरदार आणि ऐतिहासिक पुनरागमनाच्या बळावर भारताने पुन्हा एकदा पदक तालिकेत उत्कृष्ट झेप घेत चौथ्या स्थानी आपले अभियान यशस्वीरीत्या पूर्ण केले.


