उत्तराखंड : अल्मोडा येथे भीषण दुर्घटना; २०० फुट खोल दरीत कोसळली बस, ३५ जण ठार

बस मध्ये एकूण ६० जण प्रवास करत होते. एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले असून बचावकरी सुरु केले आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे,

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th November, 04:52 pm
उत्तराखंड : अल्मोडा येथे भीषण दुर्घटना; २०० फुट खोल दरीत कोसळली बस, ३५  जण ठार

अल्मोडा : येथे आज सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. रक प्रवासी बस  तब्बल २०० फुट खोल दरीत कोसळली. यात आतापर्यंत ३६  जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर २४  हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अल्मोडा येथील कुपीजवळ हा अपघात झाला. बसमध्ये ६० प्रवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सोमवार को अल्मोड़ा के मार्चुला में एक यात्री बस खाई में गिर गई।


साल्ट आणि रानीखेत येथून बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. बचावकार्या पार पडल्यानंतरच मृतांचा नेमका आकडा कळेल, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल म्हणाले. 

बस किनाथहून रामनगरकडे जात होती. बसमध्ये स्थानिक लोक प्रवास करत होते. दरीनजीक आल्यावर बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ती २०० फूट खोल दरीत पडली.  दरम्यान बस दरीत पडताना अनेक प्रवासी बसमधून फेकले गेले आणि दूरवर पडले. या अपघातात बसचा चुराडा झाला आहे. अल्मोडाचे पोलीस अधीक्षक आणि नैनितालचे पोलीस दल घटनास्थळी पोहोचले आहे. एसडीआरएफची टीमही बचावकार्यात गुंतली आहे. ही बस गढवाल मोटर्सची असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात बस खूपच जीर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या अपघाताच्या कारणाचा शोध सुरू आहे. सीएम पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य जलद पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत.


हेही वाचा