बार्देश : कळंगुटमध्ये पाच दिवसांत तब्बल ४७ टाऊट्सवर कारवाई

पर्यटन खात्याकडून २.३५ लाखांचा दंड वसूल

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
बार्देश : कळंगुटमध्ये पाच दिवसांत तब्बल ४७ टाऊट्सवर कारवाई

म्हापसा : कळंगुट पोलीस स्थानकाच्या हद्दीत पर्यटकांना पिडणाऱ्या  ४७ टाऊट्सवर येथील पोलिसांनी धडक कारवाई केली. या टाऊट्सकडून पर्यटन खात्याने ५ हजार असे २.३५ लाखांचा दंड वसूल केला आहे.

 सार्वजनिक सुरक्षा वाढवण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता उत्तर गोव्यात  विशेषतः कळंगुट व कांदोळी किनारपट्टी भागात पोलिसांनी टाऊट्स विरोधी मोहिम राबवली आहे.  पर्यटकांसह स्थानिकांना अधिक सुरक्षित आणि आनंददायी वातावरण सुनिश्चित करणे आणि उपद्रवी घटक व बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही व्यापक मोहिम राबवली आहे.      

या मोहिमेअंतर्गत गेल्या १५ दिवसांत कळंगुट पोलिसांनी एकूण ७६ टाऊट्सवर ही कारवाई केली आहे. त्यातून पर्यटन खात्याने प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ३.८० लाख रूपये दंड वसूल केलेला आहे. शिवाय पर्यटकांना सतावणार्‍या १५ फेरीवाल्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.




हेही वाचा