झारखंड-गोवा : रेल्वेच्या एसी कोचमध्ये आढळला साप; प्रवासी बिथरले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
झारखंड-गोवा : रेल्वेच्या एसी कोचमध्ये आढळला साप; प्रवासी बिथरले

वास्को : झारखंडच्या जसदीह ते गोव्याच्या वास्कोपर्यंत प्रवास करणाऱ्या साप्ताहिक वास्को-द-गामा एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये २१ ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका प्रसंगाने त्यात प्रवास करणाऱ्यांची भंबेरी उडाली. ट्रेन क्रमांक - १७३२२च्या सेकंड एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना खिडकीच्या पडद्यामागे काही तरी असल्याचा आभास झाला. (SNAKE FOUND IN GOA BOUND TRAIN; PASSENGERS PANICKED )

Snake Found in Berth of AC 2-Tier Coach on Jharkhand-Goa Train, Passengers  Share Videos - PUNE PULSE

काही वेळाने पुन्हा तोच प्रकार झाल्याने प्रवाशामधील एकाने पडदा हटवून पाहिले तर तेथे एका साप आढळला. सापाला पाहताच प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एकाने आपल्या सोशल मिडियावर याचा व्हिडिओ पोस्ट करत रेल्वेमंत्र्यांना टॅग केले व तातडीने उपाय करावे अशी विनंती केली. दरम्यान एकट्या प्रवाशाने सापाला एका चादरीत गुंडाळून बाहेर सोडले व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.  

हा व्हिडिओ गेले २ दिवस भलताच चर्चेत आहे. रेल्वेची योग निगा राखली जात नाही असे एका युजरने या व्हिडिओखाली कमेन्ट केले. रेल्वेने प्रवाशांच्या जीवाशी खेळ करू नये अशा आशयाचे अनेक कॉमेंट्स देखील या व्हिडिओ खाली केले आहेत. 

गोवा जाएं तो 'वास्‍को द गामा' में जरूर घूमें ये 5 जगह -


हेही वाचा