भाजीच्या उत्पादनाला पावसाचा फटका; दर उतरेनात!

म्हापसा बाजारात दर कायम : घटप्रभा, बेळगाव परिसरातील पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 hours ago
भाजीच्या उत्पादनाला पावसाचा फटका; दर उतरेनात!

म्हापसा : येथील बाजारपेठेत लसूण व आले तसेच इतर भाज्यांचा भाव मागील आठवड्याप्रमाणेच आहे. घटप्रभा व बेळगाव परिसरात लागणाऱ्या पावसाचा फटका पालेभाज्यांसह सर्वच भाजीच्या उत्पादनाला बसला आहे. यामुळे अजून काही दिवस लोकांना महागाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
घाऊक बाजारात गेल्या आठवड्याप्रमाणे किलोमागे लसूणचा दर ३०० रुपये, आले ८० रुपये, टोमॅटो ६० रुपये, कांदा ४०-५० रुपये, बटाट ४० रुपये, वालपापडी ६० रुपये, मिरची ६० रुपये, दोडकी ६० रुपये, कारले ६० रुपये, वांगी ५० रुपये, गाजर ५० रुपये असा भाव आहे.
भाजीपाल्याचा घाऊक बाजार भाव प्रतिकिलोप्रमाणे टोमॅटो ६० रुपये, बटाटा ४० रुपये, कांदा ४०-५० रुपये, गाजर ५० रुपये, वांगी ५० रुपये, ढब्बू मिरची ६८ रुपये, कोबी ३० रुपये, कॉली प्लॉवर ४० रुपये, दुधी ३५ रुपये, मिरची ६० रुपये, मडगड मिरची ५० रुपये, आले ८० रुपये, लसूण ३०० रुपये, भेंडी ६० रुपये, लिंबू ५ रुपये नग, पालक १० रुपये जुडी, तांबडीभाजी १० रुपये जुडी, कोथिंबीर २० रुपये जुडी, शेपू २० रुपये जुडी, कांदा पात १० रुपये जुडी, मेथी २० रुपये जुडी, मका ५० रुपयांना तीन नग, कारले ६० रुपये, दोडक‍ी ६० रुपये, बीट ५० रुपये, वालपापडी ६० रुपये, वाल ६० रुपये, काकडी ५० रुपये.
मासळीचा दर मागील आठवड्याप्रमाणेच
मासळी दर
इसवण ८०० रु.
चणाक ८०० रु.
पापलेट १००० रु.
काळी पापलेट ७०० रु.
सुगंटा (कोळंबी) ७०० रु.
कर्ली ५०० रु.
बांगडा ३०० रु.
टोकी ३०० रु.
लेपो ३०० रु.
खेकडे ३०० रु.
खुबे-तिसऱ्या ३०० रु.
वेरली ३०० रु.
माणक्या ३०० रु.
दोडयारे ४०० रु.
मडसो ७०० रु.
मुटूशो ७०० रु.
चिकन १८० रु. किलो
मटन ८०० रु. किलो
अंडी ७५ रु. डझन.

हेही वाचा