सासष्टी : बंदुकीचा धाक दाखवत अज्ञातांकडून एकाला धमकी; पोलीस तपास सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
सासष्टी : बंदुकीचा धाक दाखवत अज्ञातांकडून एकाला धमकी; पोलीस तपास सुरू

मडगाव : आके येथे मध्यवर्ती भागात बुधवारी सकाळी अज्ञातांकडून पिस्तूलाचा धाक दाखवत कुणाल रायकर (मडगाव) यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल सकाळी ७:४५ रोजी आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात होते. तेव्हा तीन अज्ञातांनी त्यांची वाट अडवली व धमकावले. कुणाल यांना बंदुकीचा धाक दाखवत आपल्या गाडीकडे नेत असताना स्थानिक मदतीला धावून आले. लोकांना पाहून तिघांनी घटनास्थळावरून पोबारा केला. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस हजर झाले. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिघांची  ओळख पटवण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या भर वस्तीत हा प्रकार घडल्याने स्थानिकांत घाबराटीचे वातावरण आहे.  

बातमी अपडेट होत आहे 

हेही वाचा