डिचोली: कुडचिरेतील प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द

आमदार प्रेमेंद्र शेट यांची पत्रकार परिषदेत माहिती

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
डिचोली: कुडचिरेतील प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द

डिचोली : कुडचिरे बाराजण येथील प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी स्थानिकांची मागणी आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून लोकभावना लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याबाबत लवकरच घेतला जाईल अशी माहिती आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वी  या प्रकल्पासाठी जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठीं आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न करताना अनेक आरोप केले. मात्र मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करत हा प्रकल्प रद्द विचार सुरू केला असे प्रेमेंद्र शेट म्हणाले. 

दरम्यान गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून हा प्रकल्पाबाबत निर्णय घेतल्याने कुडचिरेच्या सरपंचांनी आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. यावेळी म्हावळींगे-कुडचिरे पंचायत सदस्य, तसेच जिल्हा अध्यक्ष शंकर चोडणकर, भाजप मंडळ अध्यक्ष दया कारबोटकर आणि स्थानिक उपस्थित होते.   


हेही वाचा