अमेरिका : 'मॅकडॉनल्ड'मधून पसरला 'ई-कोलाय' बॅक्टेरियाचा संसर्ग; एकाचा मृत्यू, ५० हून अधिक आजारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
अमेरिका : 'मॅकडॉनल्ड'मधून पसरला 'ई-कोलाय' बॅक्टेरियाचा संसर्ग; एकाचा मृत्यू, ५० हून अधिक आजारी

वॉशिंग्टन:  अमेरिकेतील  'मॅकडॉनल्ड' या फास्टफूड आउटलेटच्या बर्गरमधून बॅक्टेरियाचा संसर्ग (ई. कोलाय) पसरला आहे.  'मॅकडॉनल्ड'चा 'क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गर' खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक लोक आजारी आहेत, त्यापैकी १० जण रूग्णालयात दाखल आहेत.

McDonald's Quarter Pounder Revamp Runs Into E. Coli Crisis - Business  Insider

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, सप्टेंबरच्या उत्तरार्धात सुरू झालेला हा ई. कोलाय विषाणू संसर्ग आत्तापर्यंत  पश्चिम अमेरिकेच्या १० राज्यांमध्ये पसरला आहे. बहुतेक प्रकरणे कोलोरॅडो आणि नेब्रास्कामध्ये नोंदवली गेली आहेत. बर्गर खाल्ल्याने एक माणूस आजारी पडल्यानंतर मॅकडोनाल्डने क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गर्समधून चिरलेला कांदा आणि बीफ पॅटीज काढून टाकल्या आहेत. सध्या तपास सुरू आहे.

Cum să previi infecția cu E. coli | Sanatate | Avantaje.ro - Ghidul complet  al femeii moderne

 'आमच्यासाठी अन्न सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. बर्गरच्या तक्रारी प्राप्त झालेल्या भागातील रेस्टॉरंटमधून क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गर तात्पुरते काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' 'मॅकडॉनल्ड'चे (अमेरिका) अध्यक्ष जो एर्लिंगर यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले. बहुतांश राज्यांना याचा फटका बसलेला नाही. ज्या रेस्टॉरंटमध्ये तक्रारी आल्या, त्यामध्ये एकाच कंपनीकडून कांद्याचा पुरवठा होत असल्याचे कंपनीने मान्य केले.


WOWT | Nebraska Breaking News, Weather, Sports | Omaha, NE

ई. कोलाय बॅक्टेरिया आपल्या आतड्यांमध्ये देखील असतात. पण यातील  काही स्ट्रॅन्स घातक असतात. तुम्ही दूषित अन्न खाल्ल्यास किंवा प्रदूषित पाणी प्यायल्यास काही स्ट्रेनमुळे अतिसार होऊ शकतो. E. coli च्या O157:H7 स्ट्रेनमुळे गंभीर आजार होऊ शकतो. ३१  वर्षांपूर्वी म्हणजेच १९९३  मध्येही या विषाणूमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा जॅक इन द बॉक्स रेस्टॉरंटमध्ये न शिजवलेले हॅम्बर्गर खाल्ल्याने चार मुलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान अमेरिकेच्या आरोग्यविभागाने फास्टफूड खाणे कमी करावे असे निवेदन केले आहे. 

Understanding E. coli: symptoms, spread, prevention | CBC News



हेही वाचा