पणजी : फौन्तेन्हाज प्रकरणी पुढील आठवड्यात सर्व भागधारकांची बैठक : महापौर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
पणजी : फौन्तेन्हाज प्रकरणी पुढील आठवड्यात सर्व भागधारकांची बैठक : महापौर

पणजी : फौन्तेन्हाज येथे पर्यटक आणि स्थानिक यांच्यात वारंवार होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात विशेष बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस, वाहतूक, पर्यटन , जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका अधिकारी आणि स्थानिक उपस्थित राहतील अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली. यावेळी स्थानिकांकडून आलेल्या सूचनांवर विचार करून त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Fontainhas Residents Decry Disruptions Caused by Domestic Tourists, Urge  Government Intervention

बुधवारी सेंट टोमे येथील स्थानिकांनी महापौर रोहित मोन्सेरात यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. यानंतर मोन्सेरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भागात अती प्रमाणात पर्यटन होत आहे. पहाटे ६ पासून रात्री उशीरा पर्यंत येथे गर्दी असते. अनेकदा पर्यटक दंगा मस्ती करतात. काही वेळेस ते थेट घरात घुसून व्हिडिओ काढतात असे त्यांना स्थानिकांनी सांगितल्याचे ते म्हणाले.  


Panaji's Fontainhas Small-Group Heritage Walking Tour 2024 - Goa

ते म्हणाले, समाज माध्यमांमुळे हा भाग सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. येथील रेस्टॉरंट आणि हॉटेलमुळे देखील हा भाग काहीसा व्यवसायिक झाला आहे. त्यामुळे साहजिकच येथे पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन जरूर द्यावे. मात्र पर्यटकांनी देखील योग्य वर्तन करणे आवश्यक आहे. त्रास देणाऱ्या पर्यटकांसाठी पोलीस तैनात करणे गरजेचे आहे. येथे पर्यटकांची संख्या नियंत्रित करावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे.


Fontainhas, Goa | Fontainhas Heritage Walk by Make It Happen

यंदा फेस्टिवल नाही 

येथील स्थानिक लोकांनी यंदा फेस्त दो पोवो न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना नको असेल तर आम्ही या भागात या फेस्टिवलचे आयोजन करणार नसल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

Panjim - Fontainhas - Rui Pires

हेही वाचा