गोवा : सेक्स ट्राफिकिंगला आळा घालण्यासाठी राज्यांतर्गत सहकार्य आवश्यक : मुख्यमंत्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा : सेक्स ट्राफिकिंगला आळा घालण्यासाठी राज्यांतर्गत सहकार्य आवश्यक : मुख्यमंत्री

पणजी : सेक्स ट्राफिकिंगची समस्या केवळ गोव्यापुरती मर्यादीत नाही.  तस्करीला आळा घालण्यासाठी तपास यंत्रणेसह राज्यांतर्गत सहकार्याची आवश्यकता आहे. यासाठी लैंगीक अत्याचाराविरोधात कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटणांचीही मदत घ्यावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. 

पणजीत अर्ज व महिला आयोगाने आयोजित केलेल्या लैंगीक तस्करीवरील परिषदेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अर्जचे संचालक अरूण पांडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रंजीता पै व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. लैंगीक अत्याचार वा महिलांवरील अत्याचाराला गोव्यात अजिबात थारा मिळणार नाही. महिला पोलीस स्थानकासह पिंंक फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस स्थानकात महिला पोलिसांच्या नियुक्तीसह ठिकठिकाणी जागृता करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लैंगीक तस्करीत काही  दुर्दैवी महिला बळी पडतात. बळी पडणाऱ्या या महिलांना संरक्षण देण्यासह लैंगीक तस्करीतील गुन्हेगाराना गोव्यात आश्रय न देण्याबाबत सरकार कटीबद्ध आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

नारीशक्तीचा आदर करणे ही गोव्याची परंपरा आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे. गोव्यात मौजमजा करण्यासाठी पर्यटक येतात. पर्यटन उद्योगाचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. सेक्स ट्राफ्रीकींंग ही समस्या सुद्धा पर्यटन उद्योगाशी संबंधित आहे. सेक्स ट्राफीकींग संबंधीत गुन्हे गोव्यात नोंद झाले व काही जणांना अटक झाली, तरी त्याचा उगम गोव्यात नाही. सेस्क ट्राफीकींगची समस्या ही खूप मोठी आहे. यांची पाळेमुळे देशविदेशात असण्याची दाट शक्यता आहे. यासाठी समस्येला तोंड देण्याकरीता राज्यांतर्गत सहकार्यासह आंतरराष्ट्रीय संस्थांचीही मदत घ्यावी लागणार आहे. या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.




हेही वाचा