बाबा सिद्दिकींच्या हत्येबाबत पोलिसांकडून 'हा' संशय व्यक्त, अटक केलेल्यांची कसून तपासणी सुरु

हत्येमध्ये सहभागी असलेल्या शूटरांमध्ये हरियाणाचा गुरमेल सिंह आणि उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यपचा समावेश


56 mins ago
बाबा सिद्दिकींच्या हत्येबाबत पोलिसांकडून 'हा' संशय व्यक्त, अटक केलेल्यांची कसून तपासणी सुरु

मुंबई: राष्ट्रवादीच्या बाबा सिद्दिकी या नेत्याच्या हत्येने पुन्हा राजकीय विश्वात खळबळ माजली असून हत्येबाबत पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या हत्येत वापरण्यात आलेली पिस्तूल पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी तीन शूटरांनी बाबा सिद्दिकीची गोळ्या घालून हत्या केली होती. हत्येसंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली असून यामध्ये दोन शूटरांचा समावेश आहे.

पोलिसांनी या प्रकरणी तीन पिस्तूले आणि २८ काडतुस जप्त केली आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेली दोन पिस्तूलं पाकिस्तानातून राजस्थानच्या सीमेवरून देशात आणण्यात आल्याची शंका आहे. या संदर्भात राम कनौजिया आणि भगवत सिंह यांना राजस्थानमध्ये पिस्तूल मिळवण्यासाठी पाठवण्यात आले होते. हत्येमध्ये सहभागी असलेल्या शूटरांमध्ये हरियाणाचा गुरमेल सिंह आणि उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप यांचा समावेश आहे, तर तिसरा शूटर शिवकुमार गौतम अद्याप फरार आहे. एका शूटरच्या फोनमध्ये बाबा सिद्दिकी यांच्या पुत्र झिशान यांचा फोटो सापडला आहे. या फोटोची देवाणघेवाण स्नॅपचॅटच्या माध्यमातून करण्यात आली होती. अटक केलेल्यांची पोलीस कसून तपासणी करत आहेत. 

बिष्णोई विरोधात करणी सेना आक्रमक:-  

एकदा चर्चेत आलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला संपवण्यासाठी एक संघटना आक्रमक झाली असून बिश्नोईचा खात्मा करणाऱ्याला १ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. क्षत्रिय करणी सेना या संघटनेने लॉरेन्सविरोधात मोर्चा उघडला असून  क्षत्रिय करणी सेनेचे अध्यक्ष डॉ राज शेखावत यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  शेखावत यांनी एका व्हिडीओद्वारे बिश्नोईच्या एन्काऊंटरवर बक्षिसाची घोषणा केली होती. एवढेच नव्हे तर त्या शूर पोलिसाच्या कुटुंबाची सुरक्षा आणि संपूर्ण व्यवस्था करणे ही आमची जबाबदारी असेल, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा