बिहार : हिंदीतील शब्दप्रयोग शिकवताना एका शिक्षिकेने घेतला चक्क 'दारूचा' आधार

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अजब शिक्षिकेची गजब शिकवणी व्हायरल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th October, 04:20 pm
बिहार : हिंदीतील शब्दप्रयोग शिकवताना एका शिक्षिकेने घेतला चक्क 'दारूचा' आधार

चंपारण्य : गुरुजन आणि शिक्षक हे पुढील पिढी घडवण्याचे कार्य करतात. त्यांना जगातील चांगल्या वाईट गोष्टीतील अंतर संजावून सांगण्यापासून त्यांची मानसिक जडण घडण करण्यापर्यंतचे काम गुरुजन वर्ग करतात. मुलांना उत्तम शिक्षण देणे आणि त्यांच्यात चांगले संस्कार रुजवणे हा शिक्षकांचा हेतू असतो. पण नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक पोस्ट सर्वांनाच चकित करून गेली आहे. केवळ सांगण्यापुरतीच आणि लिहिण्यापूरतीच 'ड्राय स्टेट' असलेल्या बिहारमध्ये एका सरकारी शिक्षिकेने कहरच केला आहे. हिंदी भाषेतील शब्दप्रयोग मुलांना शिकवण्यासाठी तिने चक्क 'दारूचा' आधार घेतला. 

Lady teacher was teaching Hindi idioms to students on the pretext of  alcohol in motihari | 'हाथ-पांव फूलना मतलब समय पर दारू न मिलना', लेडी टीचर  के 'दिव्य ज्ञान' से बच्चे पास

पूर्व चंपारणचे जिल्हा मुख्यालय असलेल्या मोतिहारीच्या प्रसिद्ध ढाका ब्लॉकच्या जमुआ मिडल स्कूलमधून ही बाब समोर येत आहे. हा पराक्रम एका महिला शिक्षिकेने केला असून त्या शिक्षिकेचे दैवी ज्ञान आता व्हायरल होत आहे. महिला शिक्षिका असेच शिकवत राहिल्यास मुलांना मार्क्स मिळो किंवा न मिळो, ते नशेच्या आहारी मात्र जातील, असे लोकांचे म्हणणे आहे. ही शिक्षका मुलांना हिंदीतील 'मूहावरों का वाक्य में प्रयोग' (वाक्यप्रचाराचा शब्दांत प्रयोग) हा स्वाध्याय शिकवत होती. तिने फळ्यावर 'हाथ पैर फुलना' या मूहावऱ्याचा शब्द प्रयोग 'समय पर शराब न मिलना' असा लिहिला.  'नेकी कर दरिया में डाल' या मूहावऱ्याचा शब्दप्रयोग 'अच्छा काम करो और दोस्त को दारू पिने के लीये इन्व्हाईट करो और भूल जाओ' असा केला. शिक्षिकेच्या या शिकवणीने बिहारच्या शिक्षण व्यवस्थेची पोलखोल केली आहे. 

Lady teacher is holding Hindi alphabetical board in hand

सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ब्लॅकबोर्डचा फोटो दाखवण्यात आला. हा लवकरच इंटरनेटवर व्हायरल झाला आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. ज्यांनी ज्यांनी ही पोस्ट पाहिली त्याचे देखील 'हात पाय फुलू लागले'. या धक्कादायक शिक्षण पद्धतीमुळे मुलांच्या शिक्षणाचे गांभीर्य कमी केले आहे, यावर पालक आणि अधिकारी क्षुब्ध आहेत. या घटनेला दुजोरा देताना गटशिक्षणाधिकारी म्हणाले की, शिकवण्याच्या या भन्नाट पद्धतीमुळे जिल्हा शिक्षणाधिकारी खूपच अस्वस्थ झाले आहेत.  जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याने अशा शिक्षणपद्धती संदर्भात कारणे दाखवा नोटिस बजावत विनीता कुमारी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले असून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल शंका उपस्थित केली आहे. 


बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू असताना आणि छपरा, सिवान आणि गोपालगंजमध्ये ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले असताना, दारूच्या माध्यमातून मुलांना मुहावरे शिकवणे ही एक गंभीर समस्या आहे. दरम्यान, जमुआ मिडल स्कूलच्या प्राचार्या सुलेखा झा यांनी महिला शिक्षिकेच्या या कृत्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. एकीकडे बनावट दारू पिऊन बिहारमध्ये दर दिवशी सरासरी ३ लोक मृत्यू पावतात. आणि दुसरीकडे बिहारचे अजब शिक्षक मुलांना दारुवर आधारित शिक्षा देताहेत. हे पाहणेच कुणालाही चिंतातुर करू शकते. 


शराबमुक्त घोषित हो ओडिशा -



हेही वाचा