लॉरेन्स बिश्नोईचा खात्मा करा! 'या' संघटनेच्या घोषणेने गँगवॉर भडकण्याची शक्यता

डिसेंबर २०२३ रोजी करणी सेनेचे सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
लॉरेन्स बिश्नोईचा खात्मा करा! 'या' संघटनेच्या घोषणेने गँगवॉर भडकण्याची शक्यता

गुजरात: राष्ट्रवादीच्या बाबा सिद्दिकी या नेत्याच्या हत्येने पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला संपवण्यासाठी एक संघटना आक्रमक झाली असून बिश्नोईचा खात्मा करणाऱ्याला १ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. क्षत्रिय करणी सेना या संघटनेने लॉरेन्सविरोधात मोर्चा उघडला असून  क्षत्रिय करणी सेनेचे अध्यक्ष डॉ राज शेखावत यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

काही काळापूर्वी राज शेखावत यांनी बडोदा येथे लॉरेन्स बिश्नोईच्या मुद्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. सुखदेव सिंग गोगामेडी हत्या प्रकरणातही लॉरेन्सचे नाव समोर आले असून लॉरेन्स आणि त्यांच्यासारख्या गुंडांनी संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे शेखावत यांनी म्हटलं होतं. क्षत्रिय करणी सेनेच राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडीओद्वारे बिश्नोईच्या एन्काऊंटरवर बक्षिसाची घोषणा केली होती. एवढेच नव्हे तर त्या शूर पोलिसाच्या कुटुंबाची सुरक्षा आणि संपूर्ण व्यवस्था करणे ही आमची जबाबदारी असेल, असेही त्यांनी नमूद केले.

५ डिसेंबर २०२३ रोजी जयपूरमध्ये करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. काही तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. बिष्णोईची बलाढ्य गुन्हेगारी टोळी संपूर्ण देशात सक्रिय आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये या टोळीने खलिस्तानी समर्थक सुखा दुनाके यांच्याही हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.या सगळ्यात आता क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्स बिश्नोई विरोधात उडी घेतली असून नवे गँगर भडकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा