टी२० वर्ल्ड कप नंतर न्यूझीलंड आता भारतीय संघाला भिडणार

२४ ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड महिला संघाच्या वनडे मालिकेला अहमदाबादमध्ये सुरुवात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
51 mins ago
टी२० वर्ल्ड कप नंतर न्यूझीलंड आता भारतीय संघाला भिडणार

न्यूझीलंडच्या महिला संघाने रविवारी (२० ऑक्टोबर) महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली असून आता लगेचच न्यूझीलंडचा महिला संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या महिला संघातील वनडे मालिकेला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेली दुसरा सामना २७ ऑक्टोबरला, तर तिसरा सामना २९ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.Can India Qualify for Women's T20 World Cup Semis After Loss?

या सामान्यांसाठी न्यूझीलंडच्या संघात फारसा बदल करण्यात आला नाहीय. टी२० वर्ल्ड कप जिंकलेल्या संघातील जवळपास सर्व खेळाडू वनडे संघातही आहे. केवळ वेगवान गोलंदाज रोजमेरी मेअर आणि फिरकीपटू लेह कास्पेरेक यांना वनडे संघातून वगळण्यात आले असून रोजमेरी मेअरला विश्रांती देण्यात आली आहे.

वनडे मालिकेसाठी संघ -

न्यूझीलंड - सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाउन, इझी गझ, मॅडी ग्रीन, ब्रूक हॅलिडे, पॉली इंग्लिस, फ्रॅन जोनास, जेस केर, एमेली केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोव, ली ताहुहू

भारत - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटील.