कोमल, आस्था, प्रज्ञा, ज्वेलला बॅडमिंटनमध्ये दुहेरी किताब

ईव्हिनिंग बॅडमिंटन ग्रुपतर्फे स्पर्धेचे आयोजन

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th October, 10:17 pm
कोमल, आस्था, प्रज्ञा, ज्वेलला बॅडमिंटनमध्ये दुहेरी किताब

पणजी : कोमल कोठारी, आस्था पौडेल, प्रज्ञा अवदी आणि ज्वेल आब्रांचेस यांनी ईबीजी बॅडमिंटन स्पर्धेतील उपकनिष्ठ आणि कनिष्ठ गटात दुहेरी किताब पटकावला. स्पर्धेचे आयाेजन इनडोअर स्टेडियम, कांपाल-पणजी येथे करण्यात आले होते.

स्पर्धेचे आयोजन ईव्हिनिंग बॅडमिंटन ग्रुपने (ईबीजी) पणजी क्रीडा संकुल आणि धोंड्स स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने राज्यात बॅडमिंटनचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने केले होते. स्पर्धेत ११, १३, १५ आणि १९ वर्षांखालील वयोगटासह एकेरी, दुहेरी आणि मिश्र सामने खेळवण्यात आले होते.


विजेते : कोमल कोठारी (मुली एकेरी ११ वर्षांखालील), अयांश सांके (मुलगे एकेरी ११ वर्षांखालील), कोमल कोठारी (मुली एकेरी १३ वर्षांखालील), प्रजेश गावस (मुलगे एकेरी १३ वर्षांखालील), आस्था पौडेल आणि प्रज्ञा अवदी (मुली दुहेरी १३ वर्षांखालील), रियान सोरेस आणि सक्षम चोपडेकर (मुलगे दुहेरी १३ वर्षांखालील), संभवी भारद्वाज. (मुली एकेरी १५ वर्षांखालील), विहान नाईक (मुलगे एकेरी १५ वर्षांखालील), आस्था पौडेल आणि प्रज्ञा अवदी (मुली दुहेरी १५ वर्षांखालील), अर्णव परोडकर आणि रौनक घाडी (मुलगे दुहेरी १५ वर्षांखालील), अमन गवस आणि ज्वेल अब्रांचेस (मिश्र दुहेरी १५ वर्षांखालील), रॅचेल फर्नांडिस (मुली एकेरी १९ वर्षांखालील), प्रत्युष पाटील (मुलगे १९ वर्षांखालील), क्रिसाने डिसा आणि ज्वेल अब्रांचेस (मुली दुहेरी १९ वर्षांखालील), अबनेर परेरा आणि ओम नाईक (पुरुष दुहेरी १९ वर्षांखालील), देशू रे आणि नेहा कुरियन (मिश्र १९ वर्षांखालील).

उपविजेते : गौरवी देसाई (मुली एकेरी ११ वर्षांखालील), कृतिक रेड्डी (मुलगे एकेरी ११ वर्षांखालील), नेत्रा जोगदंड (मुली एकेरी १३ वर्षांखालील), समर्थ साखळकर (मुलगे एकेरी १३ वर्षांखालील), नेत्रा जोगदंड आणि पिहू रेडकर (मुली दुहेरी १३ वर्षांखालील), अर्णव कन्नेकर आणि प्रजेश गावस (मुली दुहेरी १३ वर्षांखालील), अनन्या कन्नेकर (मुली एकेरी १५ वर्षांखालील), अर्णव परवाडकर (मुलगे एकेरी १५ वर्षांखालील), कोमल कोठारी आणि शांभवी भारद्वाज (मुली दुहेरी १५ वर्षांखालील), समर्थ साखळकर आणि विहान नाईक (मुली दुहेरी १५ वर्षांखालील), अधरवेद बालकृष्णन आणि संभवी भारद्वाज (मिश्र दुहेरी १५ वर्षांखालील), सिद्धी मोरे (मुली एकेरी १९ वर्षांखालील), ओम नाईक (मुलगे एकेरी १९ वर्षांखालील), रेचेल फर्नांडिस आणि संभवी भारद्वाज (मुली दुहेरी १९ वर्षांखालील), अंशुल भंडारी आणि शुभेन नाईक (मुलगे दुहेरी १९ वर्षांखालील), सिद्धार्थ हाजरा आणि न्यासा धुपडाले (मिश्र दुहेरी १९ वर्षांखालील).