मुंबई : लॉरेन्स गँगकडून सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर

म्हणाले - 'इतके' पैसे द्या अन्यथा बाबा सिद्दीकीपेक्षाही जास्त हाल करून मारू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
मुंबई : लॉरेन्स गँगकडून सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर

मुंबई :  बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सहा दिवसांनंतर अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सॲप मेसेजद्वारे देण्यात आली आहे. कॉल करणाऱ्याने स्वतः लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे.  (Bishnoi Gang)


Who is Lawrence Bishnoi? Gangster reportedly behind Baba Siddique's murder,  linked to attacks on Salman Khan, Sidhu Moosewala - BusinessToday


मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धमकीच्या मेसेजमध्ये ' या गोष्टी हलक्यात घेऊ नका.  सलमान खानला जिवंत राहायचे असेल तसेच लॉरेन्ससोबतचे वैर संपवायचे असेल तर त्याला ५ कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल' असे लिहिले होते. मुंबई पोलीस मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा माग काढण्यात व्यस्त आहेत. सलमानचे निकटवर्ती  आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या झाली होती. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. (Salman Khan Gets Fresh Threat: 'Pay Rs 5 Crore To End Enmity With Bishnoi') 


Lawrence Bishnoi: A Hero or Dreaded Gangster?


६ महिन्यांत २ प्रकरणे, त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली


१२  ऑक्टोबर : सलमान खानचे निकटवर्ती  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता बाबा सिद्दीकी आपला मुलगा झीशानच्या कार्यालयाबाहेर उभे होते तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर ६ गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्दीकीच्या पोटात दोन आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे रात्री ११.२७ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली. (attempt to kill salman khan) 


14 एप्रिल रोजी लॉरेन्सने सलमान खानच्या अपार्टमेंटमध्ये गोळीबार केला होता. - दैनिक भास्कर


१४  एप्रिल : सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला. लॉरेन्स ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर सलमानने मुंबई पोलिसांना सुरक्षेसंदर्भात निवेदन दिले. 


सलमानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली होती. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर वाय प्लस सुरक्षेत आणखी एक थर वाढवण्यात आला आहे.

याआधी सलमानला किती वेळा धमक्या आल्या?


१) जानेवारी २०२४ : दोन अज्ञात लोकांनी सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये कुंपणाची तार तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पकडल्यावर दोघांनी स्वतःला सलमानचे चाहते घोषित केले. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले. या कारणास्तव या दोघांविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला होता.


अंदर से कैसा दिखता है Salman Khan का लग्जरी फार्म हाउस? देखें Photos -  Bollywood News AajTak


२) एप्रिल २०२३: एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने मुंबई पोलिसांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याने मुंबई पोलिसांना आपले नाव रॉकी भाई असल्याचे सांगितले. तो म्हणाला होता की तो जोधपूरचा रहिवासी आहे आणि ३० एप्रिल २०२३ ला सलमानला मारणार आहे.


Salman Khan House: Address, decor and price


३) मार्च २०२३ : जोधपूरचा रहिवासी असलेल्या धाकद्रमने सलमानच्या अधिकृत मेलवर ३  ई-मेल पाठवले होते. त्यात लिहिले होते की, सलमान खान तुझा पुढचा नंबर आहे, तू जोधपूरला येताच तुला सिद्धू मूसेवालाप्रमाणे मारले जाईल.


Salman Khan Once Opened Up About Why He Chooses to Stay in Galaxy Apartment


४) जून २०२२: सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकवरून घरी परतले तेव्हा त्यांना एक अज्ञात पत्र मिळाले ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पत्रात लिहिले होते- 'सलमान खान आणि तुमची (सलीम खान) हालत मूसेवालासारखीच होईल.' यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला आणि याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


salman khan once opened aup about his father questioning about his career, salim  khan once questioned salman khan about his acting career later he praised- Salim  Khan ने बेटे Salman Khan के

लॉरेन्सचे सलमानशी वैर असण्याचे कारण

१९९८ मध्ये 'हम साथ साथ हैं' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानच्या जंगलात काळ्या हरणांची (काळवीट) शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. सलमानशिवाय सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांनाही आरोपी करण्यात आले होते.


जब सलमान के फार्महाउस तक पहुंच गया था लॉरेंस का शूटर, जानिए हमले की दो  कोशिशों की इनसाइड स्टोरी - When Lawrence Bisnoi shooter reached Salman  Khans farmhouse know the inside story ntc - AajTak


त्यानंतर बीश्नोई समाजानेही सलमानविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी जोधपूर कोर्टाने सलमानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती, मात्र या प्रकरणात त्याला नंतर जामीन मिळाला होता.सलमान खानच्या घरावर गोळीबाराची योजना आखल्याप्रकरणी दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी लॉरेन्सच्या अनेकांना अटक केली आहे.


Hum Saath Saath Hain

हेही वाचा