नायजेरिया : इंधनाच्या टँकर उलटला; मग असे काय घडले की ९४ जणांचा मृत्यू झाला ? वाचा

नायजेरियात इंधनाच्या टँकरमध्ये स्फोट झाला. या स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ५० हून अधिक लोक जखमी झाले झालेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th October, 04:26 pm
नायजेरिया : इंधनाच्या टँकर उलटला; मग असे काय घडले की ९४ जणांचा मृत्यू झाला ? वाचा

जिगावा : काल मंगळवारी मध्यरात्री उत्तर नायजेरियातील जिगावा प्रांतातून जात असताना महाविद्यालयानजीकच्या महामार्गावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने इंधनाने भरलेला ट्रक कलंडला. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले. या लोकांनी दुर्घटनाग्रस्त ट्रक मधून पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ठिणगी उडल्याने या पेट्रोलने भरलेल्या टंकरने पेट घेतला. क्षणात उडालेल्या भडक्याने तेथे उपस्थित लोक होरपळले. या दुर्घटनेत तब्बल ९४ लोकांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण गंभीर जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 


बातमी अपडेट होत आहे 


हेही वाचा