अर्थरंग : किरकोळ महागाईत सप्टेंबरमध्ये पुन्हा वाढ; ५.४९ टक्क्यांवर पोहोचला महागाई दर

सप्टेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर १.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, खाद्यपदार्थांच्या घाऊक महागाईनेही ९.४७ टक्क्यांचा उच्चांक गाठला आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th October, 11:00 am
अर्थरंग : किरकोळ महागाईत सप्टेंबरमध्ये पुन्हा वाढ; ५.४९ टक्क्यांवर पोहोचला महागाई दर

नवी दिल्ली : सलग दोन महिन्यांच्या दिलासानंतर देशातील किरकोळ महागाई पुन्हा एकदा वाढली आहे. सरकारने मागे सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये ग्राहक किंमत-आधारित किरकोळ महागाई दर ५.४९  टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरनंतरचा हा उच्चांक आहे. तर भारतातील घाऊक किमतीवर आधारित महागाई सप्टेंबर महिन्यात १.८४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

India's retail inflation jumps 5.49 pc over high base effect, weather  conditions

सरकारने सोमवारी जारी केलेल्या माहितीनुसार, भारतातील घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये अन्नपदार्थांच्या किमती आणि काही उत्पादन क्षेत्रातील वाढीमुळे वाढला आहे. घाऊक महागाईचा दर ऑगस्टमध्ये १.३१ टक्के आणि जुलैमध्ये २.०४ टक्के होता. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई दरात मासिक आधारावर ०.०६ टक्क्यांनी बदल झाला आहे.


India's retail inflation rises to 5.08% in June; IIP grows 5.9% in May |  Economy & Policy News - Business Standard

त्याच वेळी खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ९.२४ टक्के नोंदवला गेला. यापूर्वी, किरकोळ महागाईचा दर जुलैमध्ये ३.६० टक्के आणि ऑगस्टमध्ये ३.६५  टक्क्यांवर आला होता. दोन्ही महिन्यांत अन्नधान्य महागाईचा दरही सहा टक्क्यांच्या खाली होता. गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने पुन्हा महागाई वाढण्याची भीती व्यक्त करत रेपो दर आणि अन्य धोरणात्मक दर कमी न करण्याचा निर्णय घेतला होता.


High inflation may prompt RBI to go for another repo rate hike.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भाज्यांच्या किमती ३६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. डाळी आणि त्यांच्या उत्पादनांच्या किमतीतही ९.८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात फळे ७.६५ टक्के आणि धान्य ६.८४ टक्क्यांनी महागले. अंड्यांचे दरही ६.३१ टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, मसाल्यांमध्ये ६.१३ टक्क्यांची घसरण दिसून आली. एकंदरीत विचार करता समान्यांच्या खिशाला कात्री लागलीच आहे.

Consumer inflation rises back to 5% in September 

सप्टेंबरमध्ये आरोग्य सेवाही ४.०९ टक्क्यांनी महाग झाल्याचे सरकारने म्हटले आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या महागाईचा दर नऊ टक्के राहिला. तथापि, इंधन आणि वीज श्रेणीचा महागाई दर उणे १.३९ टक्के होता. चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) निर्णयाची घोषणा करताना रिझर्व्ह बँकेने सांगितले होते की, जोपर्यंत किरकोळ महागाई कायमस्वरूपी खाली येत नाही तोपर्यंत धोरणात्मक दरात कपात केली जाणार नाही. यापूर्वी घाऊक महागाईची आकडेवारीही जाहीर करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर १.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तथापि, खाद्यपदार्थांच्या घाऊक महागाईनेही ९.४७ टक्क्यांचा उच्चांक गाठला आहे.


Retail Inflation Surges to 5.49% in September as Food Prices Soar - Verve  Digest


हेही वाचा