यूपी:११वीच्या विद्यार्थ्याच्या मोबाइलमध्ये सापडले ४०००हून अधिक 'चाइल्ड पोर्नोग्राफी' व्हिडिओ

अल्पवयीनाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या अश्लील साहित्यामुळे पालकवर्ग, शाळाप्रशासन आणि पोलीस देखील चक्रावून गेलेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
यूपी:११वीच्या विद्यार्थ्याच्या मोबाइलमध्ये सापडले ४०००हून अधिक 'चाइल्ड पोर्नोग्राफी' व्हिडिओ

गोरखपुर : उत्तर प्रदेशातील गोरखपूर (GORAKHPUR-UP) जिल्ह्यातून समोर आलेल्या एका प्रकरणाने सर्वांचीच झोप उडवली आहे. येथे इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये ४००० हून अधिक 'चाइल्ड पोर्नोग्राफीक' (CHILD PORNOGRAPHIC VIDEO)  व्हिडिओचे कलेक्शन सापडले असून अशा व्हिडिओची विक्री करतांना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (SHOCKING ! GORAKHPUR MINOR HELD FOR COLLECTION & DESTRIBUTION OF CHILD PORNOGRAFIC VIDEO)  

Crackdown Against Child Porn: How Kerala Police Raided Over 400 Places And  Arrested 14 Child Porn Addicts - The420.in

मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याने हे व्हिडिओ टेलिग्रामवर अश्लील कंटेंटचे पेज चालवणाऱ्याकडून विकत घेतले होते. या कलेक्शनमधील व्हिडिओची हा मुलगा ३० टक्के कमिशन घेत विकत होता. एकूणच या प्रकाराने गोरखपुर जिल्हा हादरला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या घटनेत लक्ष घातले असून, याप्रकरणी आता सायबर सेल कसोशीने तपास करत आहे.  (CYBER CELL UP) 

हेही वाचा : 

👉 तिसवाडी: अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्यांचे होणार ट्रॅकिंग 

समोर आलेल्या माहितीनुसार गोरखपूरमधील सायबर पोलिसांना एका एनजीओकडून मुलांशी संबंधित अश्लील साहित्याच्या  विक्रीबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची सोशल मीडियावरील अॅक्टिविटी ट्रॅक करण्यात आली.  प्राथमिक चौकशीत त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. यात अनेक अश्लील व्हीडिओज सायबर पोलिसांच्या हाती लागले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सायबर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओची विक्री करण्यासाठी तो टेलिग्राम व तत्सम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करायचा. 

Child pornography crackdown by Kerala police sees 37 cases registered, six  arrested

हेही वाचा 

👉 कायदा सुव्यवस्था : 'चाइल्ड पॉर्न पाहणे हा गुन्हाच'-सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निवाडा

सायबर पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवत तपास सुरू केला

अल्पवयीन आरोपी ग्राहकांकडून प्रति व्हिडिओ ३००० रुपये आकारत असे.  तर या कलेक्शनमधील काही व्हिडिओंची किंमत २०,००० रुपयांपर्यंत होती. पैसे मिळाल्यानंतर हा मुलगा बहुतांश पैसे राज नावाच्या व्हिडिओ सप्लायरला पाठवत असे. या प्रकरणासंदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला असून सायबर पोलीस तपासात गुंतले आहेत. प्राथमिकदृष्ट्या हे काम एकट्याचे असल्याचे दिसत नाही. अश्लील बाल साहित्य वितरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. (CRIMINAL ACTIVITY) 

217 Børneporno royaltyfrie billeder, stock-fotos og illustrationer |  Shutterstock

'चाइल्ड पोर्नोग्राफी हा गुन्हा'

सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार अशा सामग्रीची साठवणूक करणे हा POCSO कायद्या अंतर्गत गुन्हा आहे. आपल्या निकालात, "चाइल्ड पोर्नोग्राफी" या शब्दाची जागा "बाल लैंगिक शोषण आणि अपमानास्पद सामग्री" ने बदलण्यात यावी व त्यासाठी POCSO कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने संसदेला केली आहे.

Law Actually: Child Porn in cache - no offence (in Georgia at least)   






 

हेही वाचा