डिचोली : सर्वण येथे मंदिरात काम करणाऱ्या दोडामार्ग येथील युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
डिचोली : सर्वण येथे मंदिरात काम करणाऱ्या दोडामार्ग येथील युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

डिचोली : कुळण-सर्वण येथील श्री योगेश्वरी मंदिराच्या सभा मंडप परिसरात शॉक लागून वैभव भिडे (२५) या झोळंबे-दोडामार्ग (DODAMARG) येथील युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणी वैभव हा दुरुस्तीकाम करत असताना विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन पडला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला लागलीच डिचोली आरोग्य केंद्रात नेले. उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पौर्णिमेनिमित्त मंदिरात देवीचा पालखी उत्सव सुरू होता, अशी माहिती देण्यात आली. वैभव भिडे हा या देवस्थानमध्ये कार्यालयीन काम करत होता.  (YOUNGSTER DIES OF ELECTROCUTION WHILE WORKING AT YOGESHWARI TEMPLE )  

हेही वाचा