तेलंगणा :अर्धवट गृहपाठ पाहून शिक्षकाने विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण, प्रकार सीसीटीव्हीत कैद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
तेलंगणा :अर्धवट गृहपाठ पाहून शिक्षकाने विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण, प्रकार सीसीटीव्हीत कैद

हैदराबाद : तेलंगणातील (TELANGANA) भद्राद्री कोठागुडेममध्ये एका शिक्षकाने एका विद्यार्थ्यास क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मुलाने घरी जात आपल्या पालकांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा पाहून पालक भडकले. याप्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाकडे शिक्षकाची तक्रार केली. चौकशी अंती शिक्षकावर कारवाई करण्यात आली. (TEACHER THRASHES CLASS 6 STUDENT OVER INCOMPLETE HOMWORK; SUSPENDED AFTER ACT CAPTURED IN CCTV)  

हे प्रकरण भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील लक्ष्मीदेवीपल्ली मंडळ येथील आहे. गोल्लागुडेम येथील मनसा विकास शाळेत सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने गृहपाठ पूर्ण केला नव्हता. शिक्षक सतीश यांनी त्याची वही तपासली असता काम अपूर्ण आढळून आले. अशा स्थितीत त्यांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र, या सगळ्याची शाळा प्रशासनाला माहिती नव्हती. (ASSAULT ON STUDENT) 

विद्यार्थ्याने घरी जात पालकांना याबाबत माहिती दिली. पालकांनी मुलाच्या अंगावर जखमांच्या खुणा पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यातून शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे उघड झाले. मुलाच्या कुटुंबीयांनी शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर शाळा प्रशासनाने सदर शिक्षकावर निलंबनाची कारवाई सुरू केली. (ACTION TAKEN)   

हेही वाचा