तिसवाडी: खासदार फर्नांडिस यांचे वक्तव्य निराधार : मंत्री खंवटे

ऐकीव विधाने करण्यापूर्वी खासदार फर्नांडिस यांनी विचार करावा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
9 hours ago
तिसवाडी: खासदार फर्नांडिस यांचे वक्तव्य निराधार : मंत्री खंवटे

पणजी : खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सनबर्न आणि माझ्याबद्दल केलेले विधान अत्यंत बालिश आणि निराधार आहे. अशी विधाने करण्यापूर्वी निदान आपल्या नावापुढे कॅप्टन आहे याचा त्यांनी विचार करावा असा सल्ला पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिला. खासदार फर्नांडिस यांनी यापूर्वी खंवटे यांच्या आदेशाने सनबर्न अवमान याचिका घालत असल्याचे ऐकल्याचे म्हटले होते. 

खंवटे म्हणाले की, फर्नांडिस हे आपण असे ऐकल्याचे सांगत आहेत. हे खूप हास्यास्पद आहे. अशी ऐकीव विधाने किटी पार्टीत केली जातात. आज काल सातवी आठवीच्या मुलांकडेही गुगलचा पर्याय असतो. 

ते देखील त्यावर सर्च करून खरे खोटे काय हे समजू शकतात. त्यामुळे ऐकीव विधाने करण्यापूर्वी खासदार फर्नांडिस यांनी विचार करावा. कॅप्टन पदवी लावणाऱ्या व्यक्तीने असे वागणे योग्य नाही.

तरुण उद्योजकांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव
खंवटे यांनी आयएमबी येथे तंत्रज्ञान विषयक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ते म्हणाले, आज राज्यात चांगले व्यवसाय मॉडेल आणि बुद्धिमान व्यक्तींनी एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण आणि उद्योग क्षेत्र एकत्र यावी लागतील. 

आयटी खात्यातर्फे आम्ही असा प्रयत्न याआधीच सुरू केला आहे. गोवा स्वयंपूर्ण करताना आम्ही तरुण उद्योजकांना आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना चालना देत आहोत.            

हेही वाचा