पेडणे : वाळू 'उपसा बंदी'ला वाटाण्याचा अक्षता; काळोखात काम सुरूच

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th October, 01:03 pm
पेडणे : वाळू 'उपसा बंदी'ला वाटाण्याचा अक्षता; काळोखात काम सुरूच

आगरवाडा : गोव्यात अद्यापही वाळू उपसा करण्यावर बंदीच आहे. मात्र याचा वाळू माफियावर काहीच फरक पडत नाही.  सर्व कायदे नियम यांना धाब्यावर बसवत आगरवाडा येथील सी एस्कॅप वॉटर फ्रंटनजीक असलेल्या शापोरा नदी पात्रात रात्रीच्या काळोखात वाळू उपक्षा सुरू आहे. स्थानिकांनी या विरोधात अनेकदा आवाज उठवला आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अजूनही येथे सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर काहीच उपाय योजना केल्या नसल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. 


Goan Varta: अग्रलेख । वाळू माफियांवर कठोर कारवाई हवी


दरम्यान बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास शापोरा नदीत वाळू उपसा सुरू असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे या अवैध प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी किनारी पोलीस स्थानकांची निर्मिती करण्यात आली होती. शिवोली किनारी पोलिसांतर्फे शापोरा नदीत गस्त घातली जाते. पण जेव्हा स्थानिक त्याच्याकडे तक्रार करतात तेव्हा बोटी नादुरुस्त असल्याची सबब पुढे केली जाते.  कोणतीही भीडभाड न बाळगता पोलिसांनी या वाळू माफियांवर कारवाई करावी असे येथील स्थानिकांचे मत आहे.   

Goa Sand Mining: चोडण येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर जुने गोवे पोलिसांची  कारवाई | Old Goa Police action against illegal sand extraction at Chorao goa  | Dainik Gomantak


हेही वाचा