क्रीडा । डॉन बॉस्को महाविद्यालय, श्री मल्लिकार्जुनला टेनिकॉईट स्पर्धेचे विजेतेपद

गोवा विद्यापीठातर्फे स्पर्धेचे आयोजन : कल्पिता, आदर्श सर्वोत्कृष्ट खेळाडू

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th October, 09:56 pm
क्रीडा । डॉन बॉस्को महाविद्यालय, श्री मल्लिकार्जुनला टेनिकॉईट स्पर्धेचे विजेतेपद

पणजी : डॉन बॉस्को महाविद्यालय, पणजीने महिलांमध्ये आणि श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाने पुरुषांमध्ये आंतरमहाविद्यालयीन टेनिकॉईट चॅम्पियनशिप २०२४-२५चे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे आयोजन गोवा विद्यापीठातर्फे करण्यात आले होते.


अटीतटीच्या लढतीत डॉन बॉस्को महाविद्यालय पणजीने सेंट झेवियर्स महाविद्यालय, म्हापसाचा २-० असा पराभव केला. कल्पिता वेलकसकरने गौरी शेटगावकरचा (२-१) २२-२०, १७-२१, २२-२० असा तर अल्पिता खेडेकरने रिचा गावडेचा (२-०) २१-१३, २१-१५ असा पराभव केला. कल्पिता वेलकसकरला उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

दुसरीकडे पुरुषांच्या गटात श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय आणि श्री चेतन मंजु देसाई महाविद्यालय कला आणि वाणिज्य काणकोणने खांडोळा सरकारी महाविद्यालय कला, विज्ञान आणि वाणिज्यचा (२-०) असा पराभव केला. आदर्श गावकरने अभिजीत वेरेकरचा (२-०) २१-१२, २१-८ने तर कैलाश वेळीपने धीरज भाटीचा (२-०) २१-८, २१-७ने पराभव केला. आदर्श गावकरला उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

बालचंद्र जादर (गोवा विद्यापीठातील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा सहाय्यक संचालक) यांच्यासह प्रमुख पाहुणे रायन परेरा (शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक, डॉन बॉस्को महाविद्यालय, पणजी) यांच्या उपस्थितीत महिला चॅम्पियनशिपच्या समापन समारंभाचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात आला.

पुरुष चॅम्पियनशिपच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे डॉ. सॅवियो लीटाओ (शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक, श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय, काणकोण) यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी निकिता नाईक (सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण पीईएस कॉलेज ऑफ एज्युकेशन, फोंडा) आणि बालचंद्र जादर (गोवा विद्यापीठातील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा सहाय्यक संचालक) देखील उपस्थित होते. त्यांनी एकत्रितपणे विजेत्यांना पदके आणि ट्रॉफी प्रदान केल्या.

विजेते व उपविजेते संघ

डॉन बॉस्को महाविद्यालयाचा महिलांचा संघ : अल्पिता खेडेकर, कल्पिता वेलकसकर, रिद्धी प्रियोळकर. सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा महिलांचा संघ : गौरी शेटगावकर, गौतमी तळेकर, अस्मिक्षा शिरोडकर, वेलेंसिया सांतामारिया.

श्री मल्लिकार्जुन पुरुषांचा संघ : आदर्श गावकर, कैलश वेळीप, कल्पेश देसाई, पृथ्वीराज गावकर, चेतन गावकर. खांडोळा महाविद्यालय : अभिजीत वेरेकर, संकेत नाईक, प्रणव नाईक, शंतनू सावंत, धीरज भाटी.