मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी महेला जयवर्धनेची वर्णी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
14th October, 12:33 am
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी महेला जयवर्धनेची वर्णी

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने रविवारी पुन्हा एकदा श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आयपीएल २०२५च्या लिलावापूर्वी संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. महेला जयवर्धने यांनी यापूर्वी २०१७ ते २०२२ या कालावधीत मुंबईचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
महेला जयवर्धनेचा विक्रम
मार्क बाउचर २०२३ आणि २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. पण आता त्याची जागा जयवर्धनेने घेतली आहे. प्रशिक्षक म्हणून जयवर्धनेचा चांगला रेकॉर्ड आहे. जयवर्धनेच्या प्रशिक्षणात मुंबई इंडियन्सने तीन जेतेपदे जिंकली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.
मुंबईने २०२३ पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू मार्क बाउचरला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. विशेषत: गेल्या हंगामात म्हणजे आयपीएल २०२४ची सुरुवात कर्णधारपदापासून झाली. संघाने रोहित शर्माला पदावरून हटवले. रोहित हा मुंबईचा यशस्वी कर्णधार आहे. मात्र, कोणतीही माहिती न देता त्यांना पदावरून हटवण्यात आले. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे कमान सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवरही दिसून आला. रोहित-पंड्याचे चाहते सोशल मीडियावर भिडले. त्या वर संघाची मैदानावर सतत खराब कामगिरी. याचा परिणाम असा झाला की संघ गुणतालिकेत तळाशी राहिला आणि हंगामातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला.
आयपीएल २०२५ साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. हा मेगा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. यासाठी बीसीसीआयने कायम ठेवण्याचे नियम जारी केले असून लवकरच लिलावासाठी जागा जाहीर केली जाणार आहे.
मुंबई इंडियन्सने केले दोन वर्षांत दोन मोठे बदल
मुंबई इंडियन्सने गेल्या दोन वर्षांत दोन मोठे बदल संघात केले होते. मुंबई इंडियन्सने दोन वर्षांपूर्वी मार्क बाऊचर यांना आयपीएलसाठी मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले होते. महेला जयवर्धने यांना मुंबई इंडियन्सने सर्व मुंबई इंडियन्सच्या संघाचे मुख्य बनवले होते. त्यानंतर गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाने अजून एक मोठा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने गेल्या वर्षी रोहित शर्माकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले.