आयएसएल २०२४-२५ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

रोमांचक सामने चाहत्यांची वाढवणार उत्कंठा : एफसी गोवाची ४ जानेवारीला ओडिशाविरुद्ध लढत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
17th October, 12:24 am
आयएसएल २०२४-२५ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) ने २०२४-२५ च्या नियमित हंगामासाठी ३० डिसेंबरपर्यंत जाहीर झालेल्या सामन्यांची संपूर्ण यादी जारी केली आहे. दरम्यान, बेंगळुरू एफसी आणि पंजाब एफसी या दोन्ही संघांनी त्यांच्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली आहे. आतापर्यंतच्या हंगामातील पहिल्या चार सामन्यांमध्ये केवळ दोन संघ अपराजित राहिले आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी ४ जानेवारी रोजी बेंगळुरू एफसी विरुद्ध जमशेदपूर एफसी यांच्यात जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये चुरशीची लढत पहायला मिळेल. तर रविवार, ५ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पंजाब एफसी मिकेल स्टहरेच्या केरळ ब्लास्टर्सशी संघर्ष करेल. त्याचबरोबर ४ जानेवारी रोजी ओडिशा एफसी आणि एफसी गोवा यांच्यात संघर्ष होईल.
नॉर्थईस्ट युनायटेड एफसी पहिला सामना ७ फेब्रुवारीला त्यांच्या घरच्या मैदानावर शिलाँगमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेल्या वर्षीच्या आयएसएल कप विजेत्या मुंबई सिटी एफसीसोबत होईल. हायलँडर्स २१ फेब्रुवारीला बेंगळुरू एफसीचे यजमानपद भूषवतील. ईस्ट बंगाल एफसी ८ मार्च रोजी मेघालयच्या राजधानीत चाहत्यांचा उत्साह वाढवतील.
११ जानेवारीला होणाऱ्या मोहन बागान एसजी आणि ईस्ट बंगाल एफसी यांच्यातील कोलकाता डर्बीच्या दुसऱ्या लेगची चाहते वाट पाहत आहेत. कोलकाता डर्बीचा दुसरा टप्पा मोहम्मडन एससी आणि मोहन बागान एसजी यांच्यात १ फेब्रुवारीला खेळवला जाईल. १६ फेब्रुवारी रोजी ईस्ट बंगाल एफसी बरोबर मोहम्मडन एससीशी संघर्ष होईल.
प्लेऑफमधील सामने ठरणार लक्षणीय
दक्षिणेत हाय-प्रोफाइल संघर्षांची मालिका चाहत्यांची उत्सुकता वाढवेल. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर ३० जानेवारीला केरळ ब्लास्टर्स एफसीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नईयन एफसीशी होणार आहे. त्यानंतर चेन्नईयन एफसी बेंगळुरू एफसीशी २५ फेब्रुवारी रोजी श्री कांतीरवा स्टेडियम, बेंगळुरू येथे एकमेकांसोबत भिडतील. प्लेऑफच्या शर्यतीत हे सामने लक्षणीय ठरणार आहेत.
नववर्षात होणारे एफसी गोवाचे सामने
४ जानेवारी २०२५ वि. ओडिशा
८ जानेवारी २०२५ वि. हैदराबाद एफसी
१४ जानेवारी २०२५ वि. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी
१९ जानेवारी २०२५ वि. ईस्ट बंगाल एफसी
२५ जानेवारी २०२५ वि. चेन्नईयिन एफसी
२ फेब्रुवारी २०२५ वि. जमशेदपूर एफसी
६ फेब्रुवारी २०२५ वि. ओडिशा एफसी
१२ फेब्रुवारी २०२५ वि. मुंबई सिटी एफसी
२२ फेब्रुवारी २०२५ वि. केरला ब्लास्टर्स एफसी
२७ फेब्रुवारी २०२५ वि. पंजाब एफसी
४ मार्च २०२५ वि. मोहम्मडेन एससी
८ मार्च २०२५ वि. मोहन बागान सुपरजायंट्स

हेही वाचा